चित्रपट महामंडळाकडून उत्तर महाराष्ट्राला सापत्न वागणूक

 

पत्रकार परिषद घेत नाशिक शाखेचा आरोप

नाशिक : प्रतिनिधी

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सदस्यांना सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नाशिक शाखेच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेत करण्यात आला आहे.

यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील सदस्यांवर कशा प्रकारे अन्याय होत आहे, याची माहिती दिली. यात अ्‌ि‍खल भारतीय चित्रपट महामंडळाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झालेला असुन अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी नाशिकला मतदान केंद्र दिले होते व उत्तर महाराष्टातील सभासदांचा विचार केला होता. मेघराज राजेभोसले यांनी निवडणूक जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुशांत शेलार, धनाजी यमकर व रणजित जाधव यांनी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करत नाशिक मतदान केंद्राला वगळले. तर  मतदान केंद्र कोल्हापूर, मुंबई व पुणे इथेच ठेवले आहे. नाशिकला दिलेले मतदान केंद्र त्यांनी काढून घेऊन. उत्तर महाराष्टातील सभासदांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप नाशिक शाखेतील सदस्याकडून करण्यात आलेला आहे.

यामध्ये उत्तर महारष्टाभर जवळ पाच लाख  सभासदाना  मतदान वंचित ठेवण्याकरिता कुटील कारस्थान करत आहे. उत्तर महारष्टामधील सभासद आर्थिक खर्च करून मुंबई, पुणे, कोल्हापूर यथे जणार नाही हे माहिती असून आपल्या निवडीचा मार्ग सोपा करण्याचा केविलवाणी प्रयत्न करीत आहे. असा आरोप करण्यात येत आहे.   यापुढे ही काही चित्रपट महामंडळातील सदस्य नाशिकसह इतर सर्व कार्यालय बंद करतील. याचा  नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर यथील  सह सर्व  सभासदानी जाहीर निषेध व्यक्त करून वेळीच जागे व्हा. असे अवाहन  पत्रकार परिषदेत नाशिक विभागिय समिती प्रमुख सुनील ढगे, श्याम लोंढे, समिती सदस्य रमेश तलवारे, रवी जन्नावर, रवी साळवे, धनाजी धुमाळ, उमेश गायकवड, अमित कुलकर्णी, विश्वास ठाकूर, अंबादास खैरे, मिलिंद तारे, रफिक सय्यद राजू फिरके , रवी बारटक्के, डॉ. अविनाश धर्मधिकारी .  असंख्य उत्तर महाराष्ट्रातील सभासदांनी केले.

धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे आदेश

चित्रपट महामंडळ निवडणूक वादांमध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयाने आदेश दिले आहेत. धर्मादाय उपायुक्त प्रदीप चौधरी यांनी निवडणूक कार्यक्रम सात दिवसात जाहीर करावा असा आदेश दिला आहे.तर निवडणूक  निर्णय अधिकारी म्हणून  आसिफ शेख, निरीक्षक धर्मदाय आयुक्त कार्यालय  यांची नियुक्ती तर निवडणूक नियंत्रक  अधिकारी म्हणून  शिवराज बंडोपंत नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *