अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या अल्पवयीन मुलावर पोस्कोचा गुन्हा

लासलगाव पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

लासलगाव  : प्रतिनिधी

लासलगाव येथील एका शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्या आई-वडिलांना मोबाईलवर फोन करून माहिती घेणाऱ्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील अल्पवयीन विद्यार्थी ओम तिडके याच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव बसवंत येथे शिक्षण घेणारा अल्पवयीन विद्यार्थी ओम तिडके रा.वडनेर भैरव ता.चांदवड जि.नाशिक हा या त्रस्त अल्पवयीन विद्यार्थिनीच्या आईवडिलांच्या मोबाईल फोनवर सतत फोन करुन माहिती घेवुन तसेच फिर्यादी शिकत असलेल्या विद्यालयात जावुन फिर्यादी शाळेत आली आहे का? ती कुठे आहे ? अशी कारण नसताना वारंवार पाठलाग करून,चौकशी करुन फिर्यादीच्या पाठीमागे सतत चोरुन जावुन पाठलाग केला

या प्रकरणी फिर्याद दखल होताच भारतीय न्याय सहीता कलम 78 सह बालकांचे लैंगिक गुन्हयापासुन संरक्षण अधिनियम 2012; चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास लासलगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर करीत आहेत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *