ऑक्टोबरमध्ये मनपा निवडणुकीची शक्यता

नाशकात तीनचाच प्रभाग, इच्छुकांत धाकधूक

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुका तीनऐवजी 2017 च्या प्रभाग रचनेनुसार होणार असल्याची चर्चा होती. आगामी पालिका निवडणुकीबाबत शिंदे-भाजप सरकारने राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत चार सदस्यीय संख्येनुसारच निवडणुका होणार असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रभाग रचनेबाबतचा निर्णय जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नाशिक मनपाची निवडणूक तीन सदस्यीय रचनेनुसार होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची चर्चा आहे.

 

 

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द करत नव्याने तीन सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. नाशिक महापालिकेत नवीन प्रभागरचेनुसार 122 नगरसेवकांवरुन 133 वर सदस्य संख्या गेली. तसेच आरक्षण सोडत जाहिर करण्यात आले. प्रारुप मतदार यादी तयार करुन अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली होती.

 

 

सत्तांतरानंतर मंत्रीमंडळाने तीनची प्रभाग रचना रद्द करत पुन्हा चार सदस्य संख्या असलेला प्रभागच होणार असल्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाला न्यायालयाने स्थगीती दिली आहे. या निर्णयाचा नाशिकच्या राजकीय स्थितीवर काय परिणाम होइल हे येत्या काही दिवसात समजणार आहे. मात्र चारचा प्रभाग नको याला भाजप वगळ्ता सर्वच पक्षीयांकडून विरोध केला जातोय.

 

 

नाशिक मनपाची निवडणूक होऊ न शकल्याने प्रशासकीय कारभार सुरु आहे. नाशिकमध्ये 44 प्रभागातून 133 सदस्य पालिकेत निवडून जाणार आहे. शहरात बारा लाख मतदार संख्या असून काही दिवसांपूर्वीच निवडणुकीची सर्व तयारी झाली आहे. चार सदस्य संख्येला स्थगीती दिल्याने सध्या तीनचाच व जी विद्यमान प्रभाग रचना आहे. त्यानुसारच ती राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *