अस्वली स्टेशन :
नाशिक-मुंबई महामार्गावरील गोंदे फाट्यावर उड्डाणपुलासाठी 20 फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, तो धोकादायक ठरत आहे. या खड्ड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
पादचार्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोे. गोंदे महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करावी, तसेच पुलाचे काम मार्गी लागावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब खातळे व नागरिकांनी केली आहे. रुंदीकरणाचे काम चार महिन्यांपासून धीम्या गतीने सुरू आहे. गोंदे फाट्यावरील
चौफुलीवर उड्डाणपुलासाठी खोदलेले मोठे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तातडीने काम पूर्ण व्हावे, अशी मागणी अजय नाठे, सुदाम जाधव, समाधान नाठे, मनोज आहेर यांनी केली आहे.