घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी पोवाडा

उमराणे ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल
उमराणे: वार्ताहर
घरपट्टी वसुलीसाठी नाशिक शहरामध्ये थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्यात येत असल्याचे पाहून ग्रामीण भागातही आता तोच पॅटर्न राबविला जात आहे. उमराणे येथील ग्रामपंचायतीने आता थकबाकीदार नागरिकांच्या घरासमोर पोवाडे सादर करत थकबाकी वसुलीचे आवाहन केले जात आहे.
देवळा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या उमराणे ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या असून शासन निधी बरोबरच ग्रामपंचायत मार्फत जमा होणारा घरपट्टी पाणीपट्टी हा स्वनिधीही विकासकामांसाठी पूरक ठरतो. पण गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे घरपट्टी व पाणीपट्टी निधीची थकबाकी प्रचंड वाढली असून कराची वसुली नसल्याने कर्मचार्‍यांचे पगार देखील देणे दुरापास्त झाले आहे. थकबाकीच्या वसुलीसाठी यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत अनेक योजना राबविल्या गेल्या. लोकन्यायालयातही केसेस दाखल झाल्या असून थकित रकमा जास्त असल्याने वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनामार्फत पारंपारिक पोवाडा गाणार्‍या कलाकारांमार्फत थकबाकीदारांच्या घराजवळ घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी पोवाडा गाऊन वसुलीची विनंती ग्रामपंचायत कार्यकर्ते करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *