शक्तीप्रदर्शन यशस्वी! शिवसैनिक आहे तेथेच!
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिक शहर-जिल्ह्यात फारसे समर्थन मिळत नसल्याचे सुरुवातीचे चित्र काही प्रमाणात बदलत आहे. नाशिक जिल्ह्यातून दोन आमदार आणि एक खासदार यांचे समर्थक मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी आहेत. याविषयी शंका नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाक रे यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना आणि शिवसैनिकांना गळाला लावण्यात शिंदेंना अद्याप यश आले नसल्याचेही या दौऱ्यात दिसून आले. शिवसैनिक आहे तेथेच राहिले. असल्याचेही पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याच्या दौर्यावर निघाले असून, त्याचा शुभारंभ नाशिकपासून झाला. शासकीय कामांबरोबरच लोकांना आणि शिवसैनिकांना भेटून आपली ताकद वाढविण्याचा त्यांचा खरा उद्देश आहे. उध्दव ठाकरे यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांना आपलेसे करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. इगतपुरी, नाशिक, मनमाड आणि मालेगावात उध्दव ठाकरे यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय असल्याने त्यांचा दौरा शक्तीप्रदर्शनाच्या बाबतीत बर्याच प्रमाणात यशस्वी झाल्याचे अनुमान काढता येते. खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नाचा एकदाचा सोक्षमोक्ष ल्यानंतरच कोणत्या बाजूला जायचे, याची चाचपणी शिवसेनेतील कुंपणावरील काही नेते मंडळी करत आहेत. या पार्श्वभूमीवर खरी शिवसेना आपलीच असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न म्हणून मुख्यमंत्री खुलेपणाने लोकांमध्ये मिसळत आहेत. आपण ख्यमंत्री सल्याचा अभिर्भाव त्यांच्यात नाही. सामान्य माणसाला भेटण्यावर त्यांचा भर या दौऱ्यात दिसून आला. त्यांच्या दौऱ्याचा खरा केंद्रबिंदू मालेगाव असल्याने आमदार दादा भुसे यांना या निमित्ताने शक्तीप्रदर्शनाची संधी मिळाली. बाह्य मालेगाव हा भुसेंचा बालेकिल्ला असल्याने त्यांनी गर्दी जमवून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. स्वतंत्र मालेगाव जिल्हा निर्मितीची घोषणा दादा भुसे यांना मुख्यमंत्र्यांकडून करवून घ्यायची होती. मालेगाव जिल्हा निर्मितीबाबत विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, मालेगाव जिल्हा निर्मितीला भुसे वगळता इतर शिंदे गट आणि भाजपासह सर्वपक्षीय आमदार अनुकूल सल्याचे आधीच दिसून आल्याने शिंदेंनी थेट घोषणा करण्याचे टाळले असावे. रिक्षाचालक, वाहनचालक, फेरीवाले यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली. ही संकल्पना दादा भुसे यांची असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. शिंदे कधीकाळी स्वत: रिक्षाचालक होते. त्यांना रिक्षाचालक, वाहनचालक, फेरीवाले यांच्या समस्या माहिती आहेत. हे सर्व घटक गरीब आहेत. आपणही गरिबीतून वर आलो असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. रिक्षाचालक, वाहनचालक आणि फेरीवाले यांचा सामान्य लोकांशी नित्याचा संपर्क असतो. या संपर्कातून हे सर्व घटक आपल्या सरकारविषयी चांगले बोलतील, याच हेतूने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली असल्याचे दिसते. कांद्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी मालेगाव विश्रामगृहाबाहेर कांद्याची पिशवी घेऊन जमले. त्यांना पोलिसांनी अडविले असताना शिंदे स्वत:हून त्यांना भेटण्यास गेले. तळागाळातील जनता आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यासाठी त्यांनी या दौऱ्याचा वापर केला. उध्दव ठाकरे यांच्यावर केलेली टीका काही नवीन नाही. मात्र, त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर अन्याय झाल्याचा मुद्दा त्यांनी नव्याने मांडला. आपण तोंड उघडले, तर महाराष्ट्रात नव्हे, तर देशात भूकंप होईल, असा इशारा त्यांनी उध्दव ठाकरे यांना दिला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवरच आपण पुढे जात आहोत, हेच पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरे काहीच नाही. आपल्याला आणि आपल्या समर्थक आमदारांना गद्दार म्हटले जात असल्याचा राग आणि संताप शिंदेंच्या ठायी दिसून येत आहे. याचमुळे दिवसेंदिवस आक्रमक होण्याचा इरादा शिंदेंनी आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करुन केल्याचे दिसते. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे यांच्या दिल्ली वार्या वाढल्या आहेत. दिल्लीहून परतल्यानंतर त्यांनी नाशिकपासून राज्याचा दौरा सुरू केला. मालेगावहून औरंगाबादचा दौरा अर्धवट सोडून ते पुन्हा दिल्लीला रवाना झाले. राज्यातील सर्व राजकीय हालचालींचे केंद्र दिल्ली हेच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची सूचना दिल्लीतूनच आली. शपथविधीपूर्वी दिल्ली हेच केंद्र होते. सर्वोच्च न्यायालयात दाखल विविध याचिका, निवडणूक आयोगासमोरील दावा यावर दिल्लीतच निर्णय होणार आहे. राज्य सरकारमधील सर्वांत मोठा पक्ष भाजपाचे पक्षश्रेष्ठी दिल्लीतच असून, मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याने मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय तिकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. त्याचमुळे औरंगाबाद दौरा सोडून त्यांना दिल्लीला जावे लागले.
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…
निफाडला निचांकी ५.६ अंश तपमान निफाड।प्रतिनिधी निफाड शहरासह तालुक्यात पारा घसरण सुरुच आहे सोमवार दि…