नाशिक येथे प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा

नाशिक येथे प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा
21 ते 25 नोव्हेंबर पर्यंत आयोजन
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येथे आंतरराष्ट्रीय महाशिवपुराण कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा यांची महाशिवपुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या नियोजन संदर्भात शासकीय विश्रामगृह नाशिक येथे आढावा बैठक नुकतीच घेण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली. प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुरान कथा शहरात प्रथमच होत असल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असणार आहे. २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही कथा म्हसरूळ नाशिक परिसरातील बोरगड या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिव महापुराण कथा विमोचनकर पंडित प्रदीप मिश्रा यांचा ‘प्रवचन सोहळा’ पूर्ण श्रध्देने, सुव्यवस्था राखून यशस्वी करणार असल्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. या सोहळ्यास भाविक भक्तांची अंदाजे पाचे ते सहा लाख पर्यंत उपस्थिती लागणार असल्याचा अंदाज असून या संदर्भात सुयोग्य नियोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची व्यापक बैठक शासकीय विश्रामगृह नाशिक येथे झाली. यावेळी त्र्यंबकेश्वर व नाशिक येथील सर्व आखाड्यांचे महंत उपस्थित होते. कार्यक्रमा संदर्भात येत्या दोन दिवसात शिव महापुराण कथेच्या नियोजनाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व महानगर प्रमुख प्रवीण तिदमे हे सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांशी बोलून समित्या निश्चित करून कामाची जबाबदारी वाटून देण्यात येणार आहे. श्री. मिश्रा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथेला असंख्य भाविक उपस्थित राहतात. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता कथेसाठी जागा, भव्य मंडप व संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी श्री शिव महापुराण कथा आयोजन समिती गठीत करण्यात येणार आहे.
यावेळी उद्योजक जितुभाई ठक्कर, निमाचे धनंजय बेळे, खा. हेमंत गोडसे, आ.सीमा हिरे, आ.देवयानी फरांदे, आ.दिलीप बनकर, आ.सरोज अहिरे, आ.हिरामण खोसकर अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे, शाम साबळे, सुदाम ढेमसे, प्रकाश लोंढे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी
प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेत ज्या महाविद्यालयीन युवक युवतींना स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे त्यांनी आपले नाव, नंबर, कॉलेजचे नाव ९४२२८४१२११ या क्रमांकावर पाठवावे असे आवाहन पालकमंत्री कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *