नाशिक : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नाशिक यांच्यावतीने आज (दि.4) रविवारी सायंकाळी 5 वाजता कालिदास कलामंदिर येथे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचा 12 हजार 500 प्रयोगांचा विश्वविक्रम केल्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष रविंद्र कदम,प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांनी जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित राहवे असे आवाहन केले आहे.