नाशिक: विधानपरिषद चे माजी आमदार तसेच धुळे मतदार संघाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे आज सकाळी निधन झाले, गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सभापती पद त्यांनी भूषवले होते, बागलाण तालुक्यातील असलेल्या प्रतापदादा सोनवणे यांनी राजकारण समाजकारण मध्ये आपला ठसा उमठवला होता, त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, 1 मुलगा असा परिवार आहे, विधान परिषदवर ते दोनवेळा निवडून गेले होते. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते,
प्रताप दादांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी….
माजी खासदार व मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी सभापती प्रताप दादांच्या निधनाची बातमी ऐकली, सकाळी सकाळी ही बातमी मन सुन्न करणारी ठरली दादांची कारकीर्द मी फार जवळून पाहिली दादांनी कधीही सत्ता किंवा कसला मोह ठेवला नाही. आपले आयुष्य जनतेप्रती समर्पित केले शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी जनतेच्या विकासासाठी लढा दिला. दादा आपल्यातून आज निघून गेले यावर विश्वास बसत नाही. एक चांगला व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आपण गमावला आहे. त्यांच्या जाण्याने समाजाची फार मोठी हानी झाली दादानां भावपूर्ण श्रद्धांजली …! त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद मिळो हीच ईश्वचरणी पार्थना…
– दादाजी भुसे, पालकमंत्री नाशिक
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…