नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तपदी प्रवीण गेडाम
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या महसूल आयुक्त पदी अखेर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे, राधाकृष्ण गमे हे आज सेवानिवृत्त झाल्याने शासनाने गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली. प्रवीण गेडाम यांनी यापूर्वी नाशिक महापालिका आयुक्त म्हणून काम केलेले आहे, त्यामुळे त्यांना नाशिक चांगले परिचित आहे, महापालिका आयुक्त असताना गेडाम यांनी अनेक निर्णय घेतले होते, सद्या ते कृषी आयुक्त म्हणून कार्यरत होते.