प्रभाग दहामध्ये प्रवीण नागरे यांचा झंझावात

ज्येष्ठ नागरिक, युवांचा प्रतिसाद; महिलांकडून औक्षण

नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रभाग दहामधील उमेदवार इंजिनिअर प्रवीण नागरे यांनी अल्पावधीतच प्रचाराचा धुरळा उडवून दिला असून, त्यांच्या प्रचारात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवावर्ग मोठ्या हिरिरीने सहभागी होत आहे. मागील आठ वर्षांत प्रभाग दहामधील नगरसेवकांनी काहीच कामे केलेली नसल्यामुळे यावेळी परिवर्तनाचे वारे जोराने वाहताना दिसून येत आहे. त्याचा फायदा प्रवीण नागरे यांना होताना दिसून येत आहे.
प्रभाग दहामधील सावरकरनगर, पिंपळगाव बहुला, राज्य कर्मचारी वसाहत, विश्वासनगर या भागात जनता प्रवीण नागरे यांच्या प्रचारात स्वत:ला झोकून देत असल्याने विरोधी उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोठी ताकद या भागात आहे.शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्याचा फायदा प्रवीण नागरे यांना होऊ शकतो. शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असलेल्या मंडळींनी प्रवीण नागरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे. प्रवीण नागरे यांच्या प्रचारार्थ या भागात महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी प्रत्येक गल्ली पिंजून काढली आहे. डोअर टू डोअर प्रचार करून प्रवीण नागरे हे सुशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित उमेदवार असल्याने त्याचा फायदा प्रभागाला होईल, असा विश्वास या भागातील नागरिकांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र आहे. प्रवीण नागरे यांच्याकडे विकासाचे व्हिजन असून, कॉलनी भागातील रस्ते, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न सोडविणे एवढेच काम नगरसेवकाचे नसते, तर नागरिकांसाठी अनेक योजना राबविण्याचा मानस नागरे यांचा आहे. त्यामुळे मतदारांनाही त्यांची भूमिका पटल्याने त्यांनी यावेळी प्रभाग दहामध्ये तुतारी वाजविण्याचा निर्धार केला आहे.

Praveen Nagre’s storm in Ward 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *