सिन्नर ः प्रतिनिधी
तालुक्यातील पांगरी येथे सिन्नर-शिर्डी महामार्गावर पालखी रोडने जाणार्या स्विफ्ट कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.6) रात्री 9.30 वाजेच्या सुमारास घडली. रविना तुषार निरगुडे (32, रा. पांगरी बु.) असे मयत महिलेचे नाव असून, ती सात महिन्यांची गर्भवती होती. आईचा मृत्यू झाल्याने पोटातील 7 महिन्यांचे बाळही दगावल्याने हळहळ व्यक्त केली
जात आहे.
सिन्नर-शिर्डी मार्गावर पांगरी शिवारात साईपालखी मार्गाच्या कडेला निरगुडे यांची वस्ती आहे. शुक्रवारी (दि.6) रात्री रविना निरगुडे यांच्यासह वस्तीवरील आणखी दोन-तीन महिला जेवण झाल्यानंतर पालखी मार्गाने शतपावली करत होत्या. यावेळी पांगरीकडून सिन्नरच्या दिशेने पालखी मार्गाने भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने (क्र. एमएच-15, ईपी-4253) रविना यांना जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रविना यांना तातडीने उपचारांसाठी सिन्नरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू
झाला होता.
दरम्यान, गर्भवती महिलेचे बाळही पोटातच दगावले होते.डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केल्यानंतर सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि.7) सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. अनिल निरगुडे यांनी दिलेल्या खबरीवरून वावी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बैरागी करत आहेत.
दरम्यान, काल दुपारी शोकाकुल वातावरणात पांगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या महिलेच्या पश्चात 7 वर्षांची मुलगी, पती, सासू, सासरे, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. येथून जवळच असलेल्या वल्हेवाडी येथे या महिलेचे
माहेर आहे.
मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…