नाशिक(NASHIK) ःप्रतिनिधी
त्रंबकेश्वर येथे होणार्या संत निवृत्तीनाथांच्या पौषवारी साठी प्रशासनाची तयारी सूरू आहे.यात्रा पौषवारीला होणार असून राज्यभरातून मानाच्या दिंड्यासह 450 पायी दिंड्यांनी त्रंबकेश्वराच्या दिशेने प्रस्थान केले आहे.यंदा उत्साहाचा जोर अधिक असल्याने प्रशासनाने नियोजन केले आहे.यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी नगरपरिषद,संत निवृत्तीनाथ ट्रस्ट,पोलिस विभाग आरोग्य विभागाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातून संत निवृत्तीनाथांच्या पौषवारी साठी वारकरी दाखल होत आहेत.दोन दिवसांपासून पौषवारीसाठी लहान मोठ्या 450 दिंड्या त्रंबकेश्वरी येत आहेत.पाणी पुरवठा,स्वच्छता,दिवाबत्ती ,ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्याचे काम नगरपरीषदेद्वारे सुरू आहेत.मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेची तयारी करण्यात आली आहे.
हेही वाचा :
संभाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट आणण्याचा विचार
संत निवृत्तीनाथ महाराज महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने यांत्रेची तयारी करण्यात येत आहे.मंदिराच्या जीर्णाद्धाराचे काम सूरू असल्याने मंदिरासमोर तात्पुरता सभामंडप उभारण्यात आला आहे.दर्शन बारीचे नियोजन करण्यात आले आहे.नाशिक पोलिस अधीक्षक शहाजी उमाप,अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे,उपअधिक्षक कविता ङ्गडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.192 पोलीस कर्मचारी,19 पोलीस अधिकारी,150 होमगार्डस् आणि दोन आरसीपी प्लाटून असा ङ्गौजङ्गाटा तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा : वैद्यकीय सुविधांमध्ये नाशिक केंद्रस्थानी
पदवीधर निवडणूकांच्या आचारसंहितेमुळे यंदा महापूजेसाठी लोकप्रतिनिधी किंवा मंत्री यांच्या हस्ते पूजा होणार नसून उपजिल्हाधिकारी श्याम गोसावी आणि मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या हस्ते पहाटे 4 वाजता शासकीय महापूजा होणार असून संत निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या वतीने आज(दि.17)रात्री अकरा वाजता अध्यक्ष नीलेश गाढवे,सचिव ऍड.सोमनाथ घोटेकर विश्वस्त तथा प्रसिद्धीप्रमुख अमर ठोंबरे,पुजारी,विश्वस्त जयंत गोसावी यांच्यासह विश्वस्त पूजा होणार आहे.
नाशिक: प्रतिनिधी शहरात टवाळ खोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता…
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या आज शासनाने बदल्या केल्या. नाशिकचे पोलीस अधीक्षक म्हणून पालघर…
नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…
भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…
छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…
12 राशींचे राशीभविष्य मेष रास मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…