नाशिक

महानुभाव संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

 

संत महंतांची विविध लॉन्समध्ये निवास व्यवस्था

नाशिक : प्रतिनिधी

शहरात होऊ घातलेल्या अखिल  भारतीय महानुभाव संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात  आली असून,भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व  महानुभाव संमेलन नाशिक येथे दिनांक 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान डोंगरे वसतिगृह मैदान येथे होणार आहे.  या संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून,  भव्य मंडप उभारण्यात आला आहे.  संमेलनाच्या तयारीसाठी  विविध समित्यांचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू आहे. या संमेलनासाठी येणार्‍या संत महंत, महिला तपस्विनी, साधू नामधारक वासनिक, भिक्षुक तसेच साहित्यिक व परराज्यातील महंत यांची व्यवस्था शहरातील चोपडा लॉन्स, राका गार्डन, श्रद्धा लॉन्स, पंचकृष्ण लॉन्स, पंचकृष्ण लॉन्स, लक्ष्मी विजय लॉन्स, शासकीय गेस्ट हाऊस, लक्ष्मी लॉन्स, सुदर्शन लॉन्स येथे करण्यात आली आहे. निवास व्यवस्थेची जबाबदारी विश्वास नागरे, अमोल पाटील, राजेंद्र जायभावे, साहेबराव आव्हाड, किरण मते यांच्यावर सोपविण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, गादी सेट, मोबाईल टॉयलेट आदींची व्यवस्था संमेलनस्थळी  करण्यात येत आहे.  संमेलनासाठी येणार्‍या संत महंत आणि भाविकांसाठी भोजन व्यवस्थेसाठी  स्वतंत्रपणे मंडप उभारण्याचे काम सुरू आहे. संमेलनात कोणतीही कसर राहू नये यासाठी आयोजकांकडून पुरेशी काळजी घेण्यात येत आहे. अखिल भारतीय महानुभाव संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन  संमेलनाचे  मार्गदर्शक   प. म. सुकेणेकर बाबा , प. म. चिरडे बाबा, प.म .  कृष्णराज बाबा मराठे आयोजक व स्वागतोत्सुक –   आमदार बाळासाहेब सानप,  दिनकर पाटील,  दत्ता गायकवाड,  सचिव प्रकाश  घुगे ,  खजिनदार प्रकाश  ननावरे , प्रभाकर  भोजने,  अरुण महानुभव ,  विश्वास  का. नागरे, तसेच   स्वागत समिती-   लक्ष्मण जायभावे,   भास्कर  गावित,उदय सांगळे,  सिताराम पाटील आंधळे, अरुण  भोजने,  राजेंद्र जायभावे.  संजय  भोजने, भास्कर सोनवणे,  सागर जैन, नंदू  हांडे,  किरण मते,  मुकुंद बाविस्कर,  सुरेश  डोळसे,  अनिल जाधव,  साहेब आव्हाड, रवी पेखळे,  छबु नागरे,  अमोल पाटील, शांताराम खांदवे, श्याम  कातोरे,  प्रदीप वैद्य तसेच सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते आणि जिल्हा निवासी संत, महंत, जिल्हा निवासी तपस्विनी, यासह सर्व  शिक्षुक, पुजारी, वासनिक, साहित्यिक, सर्व भक्त पंथातील सर्व मंडळे संस्था व पदाधिकारी, भाविक आदींनी केले आहे.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

नाशिक: प्रतिनिधी ज्येष्ठ खगोल तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. ते 86 वर्षांचे…

11 hours ago

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष

भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांचा जल्लोष छगन भुजबळांचे दमदार पुनरागमन सिडको: दिलीपराज सोनार ज्येष्ठ नेते छगन भुजबळ…

11 hours ago

छगन भुजबळ मंत्रिमंडळात,उद्या मुंबईत शपथविधी

छगन भुजबळ मंत्रिमंडळात उद्या मुंबईत शपथविधी नाशिक : प्रतिनिधी मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून…

22 hours ago

राशीभविष्य

12 राशींचे राशीभविष्य मेष रास  मेष राशीच्या लोकांनो आज प्रवास करताना कोणताही धोका पत्करू नका,…

1 day ago

झाडे उठली जीवावर!

रस्त्याने जाणेही ठरतेय धोकादायक नाशिक : प्रतिनिधी शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, महापालिकेचा…

1 day ago

अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत उच्च माध्यमिक प्रथम वर्ष…

1 day ago