नाशिक: प्रतिनिधी
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २२ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ असे चार दिवसांचे ‘होमथॉन प्रदर्शन ‘ गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात असून स्टॉलची उभारणी करण्यात येत आहे.
आपल्या स्वप्नातील घर घेणाऱ्यांसाठी नाशिक, मुंबईसह नाशकातील नावाजलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रॉपर्टीज एकाच छताखाली बघण्याची व खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनामुळे नागरिकांना उपलब्ध होईल. १५ लाखांपासून ते सुमारे ४ कोटी रुपयां- पर्यंतची घरे या प्रदर्शनात नागरीकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
नरेडकोचे नाशिक पश्चिम विभागातील हे पहिलेच प्रदर्शन आहे.
हे प्रदर्शन ७ एकरमध्ये होत आहे, त्यात ४ डोममध्ये होणार असून त्यात १२५ हून अधिक स्टॉल्स आहेत. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्यांचे स्टॉल्सही येथे साकारण्यात येत आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही स्टाॅलवर घर बुक करणाऱ्यास लगेचच नरेडकोतर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. प्रदर्शनास भेट देण्यास येणाऱ्यांनाही नरेडकोतर्फे लकी ड्रॉद्वारे एक भेट मिळणार आहे. या प्रदर्शनासाठी सहप्रायोजक म्हणून सिटी लिफ्ट, इन्व्हेरो, केनेस्ट यांचे सहकार्य मिळाले असून घर घेण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ही नरेडकोची बँकिंग पार्टनर असून एचडीएफसी आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आदी बँकांतर्फे कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे
नरेडको आयोजित प्रॉपर्टी एक्झिबिशन ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन नरेडकोचे व्हाईस प्रेसिडेंट आणि बांधकाम क्षेत्रातील अर्ध्वयू डॉक्टर निरंजन हिरानंदानी आणि नरेडको नॅशनल प्रेसिडेंट राजन बांदेलकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार तसेच नरेडकोच्या होमथॉन एक्स्पो २०२२ या प्रदर्शनाची ब्रँड ॲबेसॅडर व अभिनेत्री प्राजक्ता माळी या देखील या प्रदर्शनाला भेट देणार आहेत.
या प्रदर्शनाच्या डोम उभारणीच्या कामाच्या पाहणी प्रसंगी प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड, नरेडकोच्या प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर, नरेडकाे नाशिकचे सचिव सुनील गवादे, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, अविनाश शिरोडे, राजन दर्यानी, मयूर कपाटे, श्रीहर्ष घुगे, अश्विन आव्हाड, भाविक ठक्कर, अश्विन आव्हाड, श्रीहर्ष घुगे, प्रशांत पाटील, नितीन पाटील , मयूर कपाटे, भूषण महाजन,नंदन दीक्षित, प्रशांत पाटील, अॅड. पी. आर. गीते, देवेंद्र अहिरे, भूषण महाजन, राजेंद्र बागड, नितीन चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनात मोफत प्रवेश….
प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही मात्र प्रवेश करण्यापूर्वी नागरीकांना क्यू आर कोड द्वारे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. सदर प्रदर्शन हे डोंगरे वसतिगृह मैदानावर २२ ते २५ डिसेंबर पासून नागरीकांना खुले असून जास्तीतजास्त नागरीकांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
ग्रीन एक्झिबिशन….
नरेडकोच्या ” होमेथॉन २०२२ प्रॉपर्टी एक्स्पो” या प्रदर्शनात सामाजिक बांधिलकी म्हणून एक अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. या प्रदर्शनामध्ये जमा झालेला प्लास्टिकचा कचरा पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल मध्ये भरला जाणार असून या बॉटल्स ग्रामीण भागात बांधकामासाठी वापरला जाणार आहे. तसेच या नरेडकोच्या प्रदर्शनात ब्रँडिंगसाठी वापरण्यात आलेले फ्लेक्स होर्डिंग गोळा करून त्याचे छत बनवून गरीब लोकांच्या घरावर छप्पर म्हणून लावण्यात येणार आहे.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…