श्री कालिका मंदिरात नवरात्रौत्सवाच्या तयारीला वेग

नाशिक :प्रतिनिधी

नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिरात दि .२६ सप्टेंबर ते ५आॅक्टो २०२२या दरम्यान यात्रौत्सोव होत असून या यात्रात्सोव काळात भाविकांना मनोभावे देवदर्शन करता यावे यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती  श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव(आण्णा)पाटील यांनी दिली.
अतिप्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी मंदिर परिसरात होणा-या यात्रौत्सोवाच्या नियोजनासंदर्भात आण्णा पाटील यांच्यासह पोलिस उपायुक्त अमोल तांबे सहायक पोलिस आयुक्त दिपाली खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. गेल्या दोन वर्षापासुन कोरोनामुळे निर्बंध होते.यंदा तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा कालिका मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने यात्रात्सोव होणार आहे . यात्रेच्या काळात भाविकांना सुखकर देवदर्शन घेता यावे तसेच आगामी काळात होणार्‍या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने भव्य दिव्य असा वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात येणार आहे. त्याच बरोबर देवीदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महिला आणि पुरुष भाविकांच्या स्वतंत्र रांगा करण्यासाठी बँरेकेटिंग करण्यात आली आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी मंदिराच्या दोन्हीही मुख्य प्रवेशद्वारावर २४तास महिला व पुरुष बाऊन्सर ठेवण्यात येणार आहेत. यात्रौत्सोव काळात मंदिराच्या प्रांगणात २४तास प्रथमोपचार केंद्र सुरु रहाणार आहे .  कालिका देवी मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात्रौत्सोव काळात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी २४तास सुमारे २००हुनअधिक स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे . तसेच मोठ्या प्रमाणावर विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे लाईट गेल्यास तात्काळ जनरेटरची देखिल व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ज्या भाविकांना तात्काळ देवी दर्शन घ्यायचे आहे.अशा भाविकांनासाठी तात्काल दर्शन सुविधा देखील मंदिर संस्थानच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंदिराच्या प्रांगणात भव्य दिव्य असे सुमारे ५०खोल्या असलेले सर्व सुविधांयुक्त भक्तनिवास उभारले आहे. या भक्तनिवासात उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील यात्रेकरू भाविकांसह पर्यटक तसेच नाशिक शहरात विविध व्यांधीवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्नांसह त्यांच्या नातेवाईकांना रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  यात्रेोत्सवात काळात जास्तीत जास्त भाविकांनी देवीदर्शन व्हावे यासाठी २४तास मंदिर सुरु रहाणार आहे. यात्रौत्सोवकाळात देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा २ कोटी रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *