नाशिकमधील वाढती गुन्हेगारी, एमडी ड्रग, रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात उठविणार आवाज
नाशिक : प्रतिनिधी
शहरातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात 12 सप्टेंबर रोजी मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने सुंयक्त जनमोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाच्या तयारीच्या दृष्टीने मनसे व शिवसेना ठाकरे गटाची पंचवटी विभागीय मेळावा शुक्रवार (दि. 15)आयोजित केला होता.
मेळावा हा नाशिकमधील वाढती गुन्हेगारी त्याच बरोबर होणारे खून, दरोडे, एमडी ड्रग तसेच रस्त्यावरील खड्डे महापालिकेचा सत्ताधार्यांचा गलथान कारभार आणि यामुळे भयभीत झालेले असुरक्षित नागरिक या विषयांवर 12 सप्टेंबरला जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून सत्ताधार्यांना जाब विचारणाकरिता जनतेचा मनात असेलेली खडखद व्यक्त करण्यासाठी मार्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जनतेतून या आगामी मोर्चाचे स्वागत होत आहे. कार्यक्रमांस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, माजी आमदार वसंत गिते, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, शिवसेना राज्य संघटक विनायक पांडे, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश गिते, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, शहर उपाध्यक्ष गणेश कोठुळे, प्रसाद सानप, विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे, महिला सेना शहराध्यक्ष अक्षराताई घोडके, अश्विनी बैरागी, राहुल रोटे, कविता कुलकर्णी, हर्षल कुलकर्णी, अमोल गोजरे, रोहित भिसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे शिवसेना उपनेते दत्ताजी गायकवाड, दिलीप मोरे, भगवान भोगे, राहुल दराडे, महेश बडवे, शैलेश सूर्यवंशी, शोभा दिवसे, स्वाती पाटील, हरी काळे, वैभव ठाकरे,मसुद जिलानी, सुनील निरगुडे उपस्थित होते. पंचवटी विभागातील पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.