नाशिक : प्रतिनिधी
शहरात होत असलेल्या विश्व मराठी संमेलनाच्या तयारीला वेग आला असून, डोम उभारणीला सुरुवात झाली आहे. केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात हे संमेलन 27 फेब्रुवारीपासून होणार आहे.
या संमेलनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आदींसह विविध मान्यवर, लेखक व साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्य मंडप उभारण्यात आला आहे. याशिवाय प्रमुख अतिथींच्या निवासाचीही व्यवस्था शहरात करण्यात आली आहे. वाहनतळ, पार्किंग व्यवस्थाही सज्ज करण्यात येत आहे. संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या भागात मंडप उभारणीबरोबरच स्वागत कमानीही लावण्यात आल्या आहेत.
Preparations for the World Marathi Conference gain momentum