साहित्याचे अधिकारी, कर्मचार्यांना वाटप
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेसाठी आज, गुरुवारी (दि. 15 जानेवारी) मतदान होत आहे. तत्पूर्वी, बुधवारी (दि.14) निवडणुकीच्या कामासाठी सकाळी अधिकारी व कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन जाण्यासाठी दोनशे सिटीलिंक बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह विविध वितरण केंद्रांवर सकाळपासूनच लगबग दिसत होती. निवडणूक अधिकारी, सहाय्यक अधिकारी, मतदान कर्मचारी, पोलीस कर्मचारी, तसेच सुरक्षा दल यांची उपस्थिती लक्षणीय होती. मतदानाच्या दिवशी मतदारांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पिण्याचे पाणी, रॅम्प, सावली, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे. महापालिकेच्या या सज्जतेमुळे निवडणूक प्रक्रिया शांततामय व उत्साहात पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्रपणे मतदारयादी, मतदानयंत्रे, सीलबंद पेट्या, शिक्के, ओळखपत्रे, फॉर्म, स्टेशनरी, तसेच इतर आवश्यक साहित्य देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी महापालिकेने कर्मचार्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री, वरिष्ठ अधिकार्यांनी मतदान साहित्य वितरण प्रक्रियेवर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. कर्मचार्यांना वेळेत मतदान केंद्रांवर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, मतदारांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाची व्यापक तयारी
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततामय व सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेने प्रशासकीय पातळीवर व्यापक तयारी पूर्ण केली आहे. मतदानासाठी आवश्यक साहित्य घेऊन मतदान प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पार पडावी, यासाठी महापालिकेतर्फे सर्व आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. मतदान साहित्य वितरणाची प्रक्रिया वेळेत व शिस्तबद्धरीत्या पूर्ण करण्यात आली.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…