स्वयंरोजगार महामेळ्याव्यातून दोनशे कोटीचे कर्ज वाटप
नाशिक : प्रतिनिधी
राज्यात अडीच वर्षात कोवीडच्या नावाखाली सर्व योजना बंद करुन टाकण्यात आल्या होत्या. लोकांना घाबरुन घरातच ठेवण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री केवळ ऑनलाइनच कार्यक्रम करायचे. मात्र आताचे मुख्यमंत्री ऑफलाइन असून नागरिकांच्या समस्या जाणून घेणारे असून ऑन ग्राउड काम करणारे आहे. त्यामुळे हे सरकार ऑनलाइन नसून ऑफलाईन असल्याची टीका खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन सरकारवर करत विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार च्या कामाचे कौतूक केले.
कालिदास कलामंदीर येथे खा. हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून स्वयंरोजगार कर्ज वितरण महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख म्हणून खा. शिंदे बोलत होते. खा. हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, शिवसेना सचिव भाउसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगरप्रमुख प्रविण तिदमे आदीसह उपस्थित होते.
यावेळी 12 हजार 500 लार्भार्थ्याना 200 कोटीचे कर्ज वितरण करण्यात आले.
पुढे बोलताना खा.शिंदे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस दोघे राज्याच्या विकासाकरिता प्रयत्न करत आहे. त्याच अनुशंगाने वेेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी युवकांना स्वयंरोजगाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यात येइले. महिला चूल आणि मूलकडे पाहत असताना आता त्यांच सक्षमीकरण होते आहे. प्रधानमंत्री स्वयंरोजगार, मुख्यमंत्री स्वयंरोजगार, स्वनिधी, मुद्रा योजना या माध्यमातून अनेकजन रोजगार निर्मिती करत असून यातून रोजगाच्या संधी उपलब्ध होणार आहे. अडीच वर्षात ठप्प झालेली कामे दूर करुन राज्याला विकासात पुढे घेउन जाण्यासाठी सर्वच जन झटत असल्याचेही त्यांनी म्हटले. कोवीडच्या नावाखाली ज्या गोष्टी केल्या त्या उघड्या पडू लागल्या आहेत. संमृद्धी महामार्गा रेकॉर्ड टाइममध्ये करण्याचे काम केले. सात महिन्यापासून अनेक योजना राबवण्याच काम करतोय. सध्या सगळ्यासमोर बेरोजगाराचा प्रश्न आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देण्याच काम केले जात आहे. अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. राज्य सरकारने निश्चय केला आहे. 75 ह्जार नोकऱ्या देण्यात येणार असून त्यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तीनशे पेक्षा जास्त मेळावे घेउन पाच लाखाहून अधिक रोजगार द्यायचा आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीची आवश्यक्ता कोवीड काळात असताना तो निधीच बंद करण्यात आला होता. मात्र आम्ही हा निधी देण्यास तात्काळ सुरु करण्यात आला. महिलांसाठी माता सुरक्षित घर सुरक्षित अभियान राबवत चार कोटी महिलांची तपासणी केली. तसेच बाल सुरक्षा अभियान याप्रमाणे विविध योजना राबवल्या जाताय.
खा. गोडसे म्हणाले, देशासमोर बेरोजगारीचे संकट आहेत. विकासकामे होत राहतील, मात्र रोजगारनिर्मिती करून तसेच महिला सक्षमीकरण केली तर कुटूंब सक्षम होतील. तेरा हजार लोकांना रोजगार मिळ्णार आहे. स्वयंरोजगार मेळाव्यातून रोजगार उपलब्ध करून दयायचा आहे. तसेच मुख्यमंत्री सोळा ते अठरा तास सातत्याने काम करतायेत. विरोधकांनी विरोध करण्यापेक्षा ज्यांना स्वयंरोजगार मिळ्णार आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे महत्वाचे आहे. पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, पीएम स्वनिधी योजनेत नाशिक राज्यात अव्वल स्थानी आहे. सर्व योजनाचे एकच उद्दिष्ट असून आपल्या कुटूंबाचा जीवन उचावल पाहीजे. ज्या योजनांमधून कर्ज घेत आहात, मन लावून तो व्यवसाय पुढे घेउन जा कुठलाही व्यवसाय कमीपनाचा नाही. मन लावून काम केल्यास निश्चित त्याचा आधार मिळेल. असे पालिका आयुक्तांनी म्हटले.
पूर्वीच्या सरकारकडून फक्त घोषणाच
मुख्यमत्री केवळ घोषणा करत नाहीतर प्रत्यक्ष कृती करतात. गेल्या वेळी फक्त घोषणांचा पाउस पाडण्यात आला. नियम अटी शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. अडीच वर्षात मंत्रालयात कुणीच फिरकत नव्हत। आता लोकच दिसतील लोकांना दार उघड झाली आहे.वर्षावर पूर्वी मंत्री, खासदार, आमदार यांना प्रवेश नव्हता. तेथे सर्वसामान्यांचा विषय काय असे म्हणतं शिंदे यांनी तत्कालीन सरकारवर टीका केली.