अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज पहाटे साडेतीन च्या सुमारास निधन झाले, त्या 100 वर्षांच्या होत्या, त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने अहमदाबाद येथील यु एन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांची प्रकृती सुधारत असतानाच पहाटे ती खालावली, पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, मोदी यांनी आईच्या निधनानंतर ट्वीट केले, एक गौरवशाली शतक देवाच्या चरणी विसावले, आईमध्ये मला ते त्रिमूर्ती जाणवते, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास, निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध जीवनयात्रा यांचा समावेश होतो.हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.