नाशिक :प्रतिनिधी
लघु उद्योग भारती नाशिक आयोजित,इंजिनीयरिंग टॅलेंट सर्च – २०२३ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज बुधवार दि. १७ रोजी दुपारी ४:०० ते सायं. ७:०० यावेळेत
हॉटेल एक्सप्रेस इन येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत लघु उद्योग भारती नाशिक अध्यक्ष विवेक कुलकर्णी ,कार्यवाहक निखिल तापडिया , प्रशांत कुलकर्णी , सुजाता बच्छाव यांनी दिली. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालक डाॅ.विनोद मोहितकर ,पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
संदीप कर्णिक, अॅडिशनल डायरेक्टर, (इन्व्हेस्टिगेशन) प्राप्तीकर विभाग मारूती मुद्देवाड, सह्याद्री फार्म अध्यक्ष विलास शिंदे , उच्च तंत्रशिक्षण सहसंचालक व प्राचार्य शासकीय तंत्रशिक्षण डाॅ.गोरक्ष गर्जे या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
लघु उद्योग भारती नाशिक शाखेतर्फे दरवर्षी इंजिनीयरिंग टॅलेंट सर्च अशा उपक्रमाचे आयोजन केले जाते. या स्पर्धेमागील मुख्य उद्देश प्रस्थापित अभियंत्यांच्या औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील लक्षणीय योगदानाचे मूल्यमापन करणे आहे. या उपक्रमाचे हे तृतीय वर्ष आहे.
याउपक्रमाअंतर्गत औद्योगिक क्षेत्रातून २०० तर शैक्षणिक क्षेत्रातून ३०० अभियंत्यांनी भाग घेतला. लघु उद्योग भारती नाशिक शाखेच्या तज्ञ समितीच्या देखरेखित या प्रवेशिकांतून औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रातून प्रत्येकी २० उत्तम स्पर्धक निवडले गेले. यातून औद्योगिक क्षेत्रातील तीन व शैक्षणिक क्षेत्रातील तीन सर्वोत्तम स्पर्धकांची घोषणा या कार्यक्रमात होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यास रोख रक्कम, ट्रॉफी, सर्टिफिकेट देऊन सत्कार होणार आहे. तसेच उत्तेजनार्थ बक्षिसे ही दिली जाणार आहेत.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…