लक्ष्यवेध : प्रभाग-24
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 24 हा नाशिक महापालिकेतील महत्त्वाचा व चर्चेत राहणारा प्रभाग आहे. लोकसंख्या 52,306 असलेला हा प्रभाग सामाजिक, राजकीय आणि विकासात्मकदृष्ट्या गतिमान मानला जातो. प्रभाग 24 मध्ये राजकीय समीकरणे बदलत असली, तरी इच्छुकांची यादी मोठी आहे. यंदा प्रभागात माजी नगरसेवकांच्या पक्षांमध्ये बदल दिसून येत आहे.
दिवंगत कल्पना पांडे यांच्या जागी त्यांची कन्या शिवानी पांडे या शिवसेना उबाठाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून, माजी नगरसेविका कल्पना चुंभळे, माजी नगरसेवक राजेंद्र महाले, भाजप सिडको मंडळ अध्यक्ष राहुल गणोरे, कैलास चुंभळे, अॅॅड. अजिंक्य गिते, सुनंदा गिते, सुरेखा नेरकर, अश्विनी बोरस्ते, प्रशांत कोतकर या नावांची चर्चा आहे. आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे-बेंडाळे यांचेही नाव चर्चेत आहे. शिवसेने(शिंदे गट)कडून महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे, त्यांच्या पत्नी सोनल तिदमे आणि बंधू नीलेश तिदमे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अमर वझरे, अमोल महाले, सागर मोटकरी, बाळासाहेब गिते इच्छुक आहेत. मनसेकडून संदीप दोंदे, तुषार जगताप, अक्षय खांडरे, विजय रणाते यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेना उबाठाकडून शिवानी पांडे, चारुशीला गायकवाड, रत्नमाला बडदे इच्छुक असल्याचे सांगण्यात येते.
सध्याची स्थिती पाहता प्रभाग 24 मध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. नागरिकांचा प्रवास खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी पाणीपुरवठा, अतिक्रमण, गटार व रस्त्यांच्या दुरवस्थेची समस्या अद्याप कायम आहे. आगामी निवडणुकीत या प्रश्नांवरच मतदारांचा कल ठरण्याची शक्यता आहे. गतनिवडणुकीचा म्हणजे सन 2017 चा आढावा घेताना दिसून येते की, या प्रभागात मागील निवडणुकीत विविध पक्षांचे उमेदवार निवडून आले होते. दिवंगत कल्पना पांडे यांची कन्या शिवानी पांडे (शिवसेना उबाठा), तर राजेंद्र महाले आणि कल्पना चुंभळे हे भाजपचे उमेदवार निवडून आले होते. प्रवीण (बंटी) तिदमे हे शिवसेना उमेदवार निवडून आले होते. दुसर्या क्रमांकाची मते सुनंदा गिते, कैलास चुंभळे, सुरेखा नेरकर, राम पाटील या सर्व भाजप उमेदवारांना मिळाली होती.
सध्याची स्थिती
प्रभाग 24 मध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. नागरिकांचा प्रवास खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असले, तरी पाणीपुरवठा, अतिक्रमण, गटार व रस्त्यांच्या दुरवस्थेची समस्या अद्याप कायम आहे. आगामी निवडणुकीत या प्रश्नांवरच मतदारांचा कल ठरण्याची शक्यता आहे.
या आहेत समस्या
♦ लेखानगर येथील मुख्य रस्त्यावर अनधिकृत भाजी बाजार.
♦ वाढते अतिक्रमण.
♦ खांडे मळा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था.
♦ गणेश चौक उद्यान परिसरातील वाढती गुन्हेगारी.
♦ मोकाट जनावरांचा त्रास.
♦ गोविंदनगर, कर्मयोगीनगर परिसरातील अपुरा पाणीपुरवठा.
♦ मोठ्या इमारतींच्या बांधकामामुळे रस्त्यांची हानी.
प्रभागाचा परिसर
तिडकेनगर, कालिकानगर, प्रियंका पार्क, खांडे मळा, महाले मळा, उदय कॉलनी, बडदेनगर, महाराणा प्रताप चौक, तुळजाभवानी चौक, भुजबळ फार्म, मनोहरनगर, गोविंदनगर, पांगेरे मळा, मॉडर्न शाळा, सुंदरबन कॉलनी, शिवाजी चौक, लेखानगर, इंदिरा गांधी झोपडपट्टी क्रमांक 1 व 2, झीनत, फिरदोस, इफको, आदर्श कॉलनी, गणेश चौक, मनपा उद्यान.
प्रभागातील विकासकामे
♦ कॉलनी व मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण.
♦ पाकिस्तानचे 56 टँक उद्ध्वस्त करणारा टी-50 रणगाडा प्रभागात स्थापित.
♦ पक्षिघराची निर्मिती.
♦ आर. डी. सर्कल व जॉगिंग ट्रॅक सुधारणा.
♦ चौकांमध्ये 32 सीसीटीव्ही बसविण्यात आले.
♦ अंतर्गत ड्रेनेज लाइन आणि जलकुंभ बांधकाम.
सन 2011 नुसार लोकसंख्या
♦ एकूण लोकसंख्या : 52,306
♦ अनुसूचित जाती : 4,154
♦ अनुसूचित जमाती : 1,696
विद्यमान नगरसेवक

प्रवीण (बंटी) तिदमे

कल्पना चुंभळे

स्व. कल्पना पांडे

राजेंद्र महाले
राजकीय समीकरणे आणि इच्छुक
यंदा प्रभागात माजी नगरसेवकांच्या पक्षांमध्ये बदल दिसून येत आहे. दिवंगत कल्पना पांडे यांच्या जागी त्यांची कन्या शिवानी पांडे या शिवसेना उबाठाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून, माजी नगरसेविका कल्पना चुंभळे, माजी नगरसेवक राजेंद्र महाले, भाजप सिडको मंडळ अध्यक्ष राहुल गणोरे, कैलास चुंभळे, अॅॅड. अजिंक्य गिते, सुनंदा गिते, सुरेखा नेरकर, अश्विनी बोरस्ते, प्रशांत कोतकर या नावांची चर्चा आहे. आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे-बेंडाळे यांचेही नाव चर्चेत आहे. शिवसेनेकडून (शिंदे गट) महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रवीण तिदमे, त्यांच्या पत्नी सोनल तिदमे व बंधू नीलेश तिदमे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी (अ.प.)कडून अमर वझरे, अमोल महाले, सागर मोटकरी, बाळासाहेब गिते, तर मनसेकडून संदीप दोंदे, तुषार जगताप, अक्षय खांडरे, विजय रणाते यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेना उबाठाकडून शिवानी पांडे, चारुशीला गायकवाड, रत्नमाला बडदे इच्छुक आहेत.

काँक्रिटीकरणामुळे रस्ते खराब
चांगले रस्ते खणून नवीन काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. पण गॅस पाइपलाइनमुळे खणलेले रस्ते पुन्हा बुजवले गेले नाहीत, ही मोठी गैरसोय आहे.
– दीपक लांडगे

रस्त्यांची दुरवस्था
गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने किरकोळ समस्यांकडेही दुर्लक्ष होते. पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, पण महापालिकेकडून ठोस कार्यवाही होत नाही.
– बाळासाहेब गिते

टवाळखोरांचा त्रास
गणेश चौक येथील संभाजी महाराज बालोद्यानाची दुरवस्था झाली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करूनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे टवाळखोरांचा त्रास वाढत असून, महिला त्रस्त आहेत.
– महेश बागूल

पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर
कर्मयोगीनगर, तिडकेनगर भागाला पाणीटंचाईचा मोठा फटका बसतो. पावसाळी गटार नसल्याने घरात पाणी शिरते. आंदोलने करूनही समस्या सुटत नाहीत.
– अंबादास जगताप