नाशिक

कोचिंग क्लासेस चालवणार्‍या महिलेच्या घरात घरफोडी; 2 लाख 61 हजारांचा ऐवज लंपास

सिडको : विशेष प्रतिनिधी
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगर येथील एका कोचिंग चालवणार्‍या महिलेच्या घरात घुसून चक्क कुलूप तोडून अतिक्रमण करत सुमारे 2 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत फिर्यादी सुप्रिया साहेबराव आहिरे (वय 32, रा. फ्लॅट नं. 09, योगेश्वर अपार्टमेंट, भीमनगर, नाशिकरोड) ही महिला खासगी कोचिंग क्लास चालवत आहेत. फिर्यादी आहिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी विनोद पवार, प्रणय पगारे, अरुण पगारे व श्रुतिका पगारे यांनी घरात घुसून वरील सर्व सामान बेकायदेशीरपणे चोरून नेले.
चोरीस गेलेल्या मालामध्ये विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल फोन, कपाटातील कपडे, 85,000 रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने (पेंडल्स, चेन, अंगठ्या) व अन्य घरगुती वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय एमपीएससी व यूपीएससीसाठी आवश्यक असलेली पुस्तके आणि महत्त्वाची कागदपत्रेही चोरून नेण्यात आली आहेत. या गंभीर घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, नाशिकरोड परिसरात चोरी व जबरदस्तीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Gavkari Admin

Recent Posts

नाशिकमधील प्रति पंढरपूर विहितगाव

महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपुरातील पांडुरंग, विठोबा. राज्यभरातील वारकरी लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वर्षातून एकदा तरी…

5 minutes ago

बिबट्यांचा नागरी वस्तीत वावर वाढला

सकाळी 8 वाजताच गंगापूर कॅनॉलवर फेरी पंचवटी : वार्ताहर शहर परिसरालगतच्या बिबट्यांचा वावर आता नागरी…

11 minutes ago

एटीएम पिन चुकीचा सांगितल्याने खून

चार संशयित जेरबंद : गुन्हेशाखा युनिट एकची कामगिरी पंचवटी : वार्ताहर म्हसरूळ परिसरातील चामरलेणी येथील…

14 minutes ago

आमदारांच्या गावात एसटी येईना!

विद्यार्थ्यांनी रोखली बस शहापूर : प्रतिनिधी ’गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे बस’ हे राज्य…

17 minutes ago

साठ वर्षांपूर्वीचे जुने झाड कोसळले

वाटसरू ठार; मार्गावरील वाहतूक एकेरी सुरू इगतपुरी : प्रतिनिधी घोटी शहरात शुक्रवारी (दि. 4) सकाळी…

23 minutes ago

इंदिरानगरला कत्तलखान्यावर धाड

इंदिरानगर : वार्ताहर गोवंशाची कत्तल करून मांस वाहनाच्या सहाय्याने इतरत्र घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्यांना इंदिरानगर…

29 minutes ago