भामरे यांच्या पत्नी व मुले किराणा सामान घेण्यासाठी बाहेर गेले होते.
सिडको : विशेष प्रतिनिधी
किराणा आणण्यासाठी घराबाहेर गेलेल्या कुटुंबाच्या अनुपस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळेनगर येथे दिवसाढवळ्या घडली आहे
काळेनगर येथील ग्रेप सिटीमधील मेरॉट इमारतीत राहणारे फॅब्रिकेशन व्यावसायिक नरेंद्र भामरे यांचे घर 13 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते साडेसहा या वेळेत फोडण्यात आले. भामरे यांच्या पत्नी व मुले किराणा सामान घेण्यासाठी बाहेर गेले होते. त्याचदरम्यान अज्ञात चोरट्यांनी बाल्कनीकडील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. हॉलमधील काचेचा दरवाजा फोडल्यानंतर बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून आतील दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली.
चोरट्यांनी घरातून सोन्याची माळ, दोन सोन्याच्या चैन, सोन्याची अंगठी, लहान मुलांचे सोन्याचे दागिने तसेच दोन लाख रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 39 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर घरातील अस्ताव्यस्त अवस्थेमुळे चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी भामरे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आहिरराव पुढील तपास करीत आहेत.
Property worth Rs 2.5 lakhs looted after breaking into a locked house सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…