मुंबईनाका परिसरात छापा
सिडको : विशेष प्रतिनिधी
मसाज पार्लरच्या नावाखाली चालणार्या अनैतिक देहव्यापारावर छापा टाकून मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाच पीडित मुलींची सुटका केली आहे. मुंबई नाका परिसरातील मेट्रोझोन समोर “आरंभ स्पा” या नावाने सुरू असलेल्या मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
छाप्यात मसाज पार्लर चालवणारी महिला खुशबू परेश सुराणा हिला ताब्यात घेण्यात आले. पीडित महिलांची चौकशी केली असता, त्यांना मसाज पार्लरच्या आडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचे स्पष्ट झाले.
या महिलांमध्ये कानपूर, दिल्ली, मिझोराम, बिहार आणि नाशिक येथील महिलांचा समावेश आहे. खुशबू सुराणा हिच्याविरोधात यापूर्वीही पिटा व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर आता मुंबई नाका पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पीसीबी एमओबीच्या पथकाने सदर स्पावर छापा टाकला.
ही कारवाई सपोनि विश्वास चव्हाणके, प्रवीण माळी, शेरखान पठाण, नामदेव सोनवणे तसेच पोलिस अंमलदार गणेश वाघ, समीर चंद्रमोरे, प्रजित ठाकूर, नीलिमा निकम, लिला सुकटे, वैशाली घरटे, हर्षल बोरसे आणि दीपक पाटील यांनी संयुक्तरीत्या
पार पाडली.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…