आडवण, पारगावच्या शेतकर्यांचा भूसंपादनास विरोध
इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे आडवण व पारदेवी येथील वडिलोपार्जित शेतजमिनी औद्योगिक वसाहतीसाठी देण्यास शेतकर्यांचा विरोध आहे. भूसंपादन करू नये, यासाठी माजी आमदार पांडुरंग गांगड, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ व शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकर्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.
मोर्चानंतर शेतकर्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडून जोरदार आंदोलन केले. शासनाने इगतपुरी तालुक्यात अनेक प्रकल्प आणून शेतकर्यांना भूमिहीन करण्याचे काम केले आहे, असा आरोप माजी आमदार गांगड यांनी केला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गुंजाळ, शेतकरी संघटनेचे नेते धुमाळ, गाव बचाव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोकणे व उपाध्यक्ष विष्णू कोकणे यांनी भूसंपादनास विरोध केला.
आंदोलनात तुकाराम बाबा, नवनाथ कोकणे, नामदेव कोकणे, पंढरीनाथ शेलार, रामा कोकणे, रोहिदास शेलार, सुरेश कोकणे, नितीन पुंदे, रमेश कोकणे, मधुकर गुंजाळ, काळू रेरे, विश्राम शेलार, रामदास रेरे, पप्पू कोकणे, दत्तू कोकणे, तुकाराम कोकणे, रमेश कोकणे, ज्ञानेश्वर कोकणे, सुनील पुंडे, कृष्णा शेलार, शिवाजी कोकणे, सुरेश करवर, मनीषा कोकणे, उषा कोकणे, सुमन कोकणे, मनीषा पुंडे, शांताबाई कोकणे, सुनीता कोकणे, हिराबाई कोकणे, सुगंधा कोकणे, लीलाबाई कोकणे यांच्यासह महिला व शेकडो ग्रामस्थ सहभागी
झाले होते.