मनपाच्या अधिकार्यांना धरले धारेवर
पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटीतील फुलेनगर येथील सार्वजनिक तसेच सुलभ शौचालयांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मनपा प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नव्हती. याबाबत आरोग्य विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शौचालयांच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधींचा राग अनावर झाला होता.
नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक हेमंत शेट्टी, नगरसेविका मोनिका हिरे, सागर लामखेडे व सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे यांनी सोमवारी (दि.23) मनपाच्या संबंधित विभागांच्या अधिकार्यांसह फुलेनगर परिसरात पाहणी दौरा केला. शौचालयांच्या दुरवस्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आरोग्य, सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना फैलावर घेत तत्काळ समस्या निवारणाच्या सूचना दिल्या.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध विकासकामे सुरू असून, शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक घरपट्टी व पाणीपट्टीच्या माध्यमातून महापालिकेला कर भरतात, त्यामुळे त्यांना मूलभूत सुविधा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. प्रभाग क्रमांक चारमध्ये पेठरोड परिसरातील फुलेनगरमध्ये शाहूनगर, शेषराव महाराज चौक, मुंजोबा चौक, विजय चौक, वॉटर टँक परिसर, गजानन चौक, अवधूतवाडी, महाराणा प्रतापनगर, सम्राटनगर, गौडवाडी, भराड वस्ती, राहुलवाडी, वैशालीनगर, लक्ष्मणनगर, तेलंगवाडी, कालिकानगर, त्रिमूर्तीनगर, वडारवाडी, श्रीरामनगर, वज्रेश्वरीनगर आदी भागांचा समावेश आहे. येथे सुमारे 17 ते 18 हजार लोकसंख्या आहे. बहुतांश नागरिक मोलमजुरी व हमालीची कामे करतात. फुलेनगर भागात पाच सार्वजनिक व पाच सुलभ अशी एकूण दहा शौचालये आहेत. या शौचालयांबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मनपाच्या आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा व भुयारी गटार विभागाच्या अधिकार्यांसह पाहणी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक हेमंत शेट्टी, नगरसेविका मोनिका हिरे, सामाजिक कार्यकर्ते शंकर हिरे, पाणीपुरवठाचे उपअभियंता भरत ठाकरे, कनिष्ठ अभियंता बागूल, विभागीय स्वच्छता निरीक्षक चव्हाण, स्वच्छता निरीक्षक प्रमोद बागूल, भुयारी गटार उपअभियंता गावित, घोडके, बांधकाम विभाग जाधव, मलेरिया विभागाचे राऊत व गवळी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. यात डागडुजी, दरवाजे, भांडी, झाकणे (ढापे), चेंबर झाकणे आदी बाबींची माहिती देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून वेळेत दखल घेतली जात नसल्याने शौचालयांची दुरवस्था कायम राहत असल्याचे सांगितले जाते.
रस्त्यावर शौचालय
दिंडोरी रोडवरील डावा तट कालव्यालगत पाटबंधारे विभागाचा मोठा मोकळा भूखंड आहे. श्रीरामनगर, शाहूनगर, वज्रेश्वरीनगर तसेच कालव्यालगतच्या झोपडपट्टीतील रहिवासी येथे उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र दररोज दिसून येते. एकीकडे नाशिक शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे झोपडपट्टी भागात उघड्यावर शौचास नागरिक जात असल्याचे चित्र आहे.
Public representatives express strong anger over the issue of toilets in Phulenagar
अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…
प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्या…
अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…
मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…
व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्याचे वर्गीकरण करण्यात अपयश…
पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…