वडाळीभोईजवळील प्रकार; दोन मोबाईल लंपास
चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा महामार्गावर वडाळीभोई उड्डाणपुलाजवळून जाणार्या एका महिलेच्या
हातातून चोरट्यांनी पर्स हिसकावून 23 हजार रुपयांचे दोन मोबाईल लंपास केले. ही घटना गुरुवारी (दि. 22) सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात दोघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक येथील यश संपत पवार आणि त्यांच्या पत्नी रत्ना यश पवार (रा. अंबड) हे नाशिकहून मालेगावकडे दुचाकीवरून (एमएच 15- एचझेड 9926) जात असताना वडाळीभोई उड्डाणपुलाच्या मागे दुसर्या एका दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने रत्ना पवार यांच्या मांडीवर ठेवलेली पर्स हिसकावून पळ काढला. या पर्समध्ये 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि 8 हजार रुपये किमतीचा दुसरा मोबाईल असे एकूण 23 हजारांचा ऐवज होता. या चोरीबाबत यश पवार यांनी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे तपास करत आहेत.
खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…
मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…
मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…
दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…
मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…
दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…