मुलाखत : अश्विनी पांडे
अभिनय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असल्याचे मत तुझ्या जीव रंगला फेम अंजलीबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर हिने गांवकरीशी संवाद साधताना व्यक्त केले.
शिक्षण कुठे झाले?
पुण्यात अहिल्यादेवी हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. बीएमसीसी महाविद्यालयातून पदवीच शिक्षण घेतले. नारळकर इन्सट्यिुडमधून बिसनेट मॅनेजमेंट कोर्स केला. इनसर्चमधून मास्टर्स ऍण्ड बिझिनेस सायन्सची पदवी घेतली.
अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात कशी झाली?
बालनाट्यापासून अभिनयाला सुरूवात केली. नंतर शाळा, महाविद्यालय आणि विविध स्पर्धेत भाग घेत अभिनय केला.नाटकात काम करतानाच तुझ्यात जीव रंगला मालिकेसाठी ऑॅफर आली. ऑडीशन दिली आणि सिलेक्शन झाले.
अभिनय क्षेत्रात नसतात तर ?
अभिनय क्षेत्रात नसते तर इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर केले असते.
अभिनय की सूत्रसंचालक ?
मी सूत्रसंचालन केले असले तरी अभिनय जवळचा आहे
.
कोणती भूमिका करायला मिळावी असे वाटते?
मला सर्व प्रकारच्या भूमिका करायला आवडतील.
कोणत्या प्लॅटफॉर्मवर काम करायला आवडते ?
सर्वच प्लॅटफॉर्मवर काम करायला आवडत. पण नाटकातून जास्त शिकायला मिळत.
प्रेेक्षकांसाठी कोणते नवीन प्रोजेक्ट येणार आहेत?
एक चित्रपट येणार आहे. त्यासह अजून काही सरप्राईजेस आहेत ते येत्या काळात प्रेक्षकांसमोर येतील.
आठवणीतील फॅन मुव्हमेंट ?
मंगलोरियन फॅन होते त्यांनी मला हत्तीच्या केसाची अंगठी गिफ्ट केली. ही अंगठी सकारात्मकतेसाठी घालण्यात येते.
या क्षेत्रात येऊ पाहणार्यां तरूण तरूणींना काय संदेश द्याल?
अभिनय क्षेत्रात करिअसर करायचे असल्यास अभिनयावर फोकस करण्याबरोबर शिक्षण घेण्यास तरूणवर्गांनी प्रथम प्राधान्य द्यायला हवे.
लग्न कसे जुळेल?
तुझ्यात जीव रंगला मालिका सुरू असताना आमची छान मैत्री झाली होती. शूटिंग संपल्यानंतर प्रेमाची जाणीव झाली. हार्दिक आणि मी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतरचे आयुष्य कसे आहे.?
लग्नानंतर आयुष्य बदललेले नाही. फक्त माहेराहून सासरी येताना भावनिक क्षण निर्माण होतो. तेव्हा आयुष्य बदललय अस वाटते.
कुटूंबासाठी वेळ कसा काढता?
शूटींग सुरू असते तेव्हा कुटुंबासाठी वेळ काढणे शक्य होत नाही. लग्नानंतर मी थोडा ब्रेक घेतला आहे. सध्या कुटुंबासाठी वेळ देत आहे.
आवडता खाद्यपदार्थ,रंग,ठिकाण?
मी फुडी आहे. सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ आवडतात. सर्व प्रकारचे रंग आवडतात. कोल्हापूर हे आवडते ठिकाण आहे.
वेळ मिळेल तेव्हा कोणता छंद जोपासता?
स्टोरी टेल ऍपवर कथा ऐकायला आवडतात.
फिटनेसचे रहस्य काय?
मी फिटनेसच्या बाबातीत विशेष मेहनत घेत नाही. मात्र जेवणाची वेळ आवर्जून पाळते.
लाइफस्टाइल कशी आहे?
शूटिंग असते तेव्हा पूर्णपणे बिझी असते. इतरवेळी निवांत दिवस असतो.
टायर फुटल्याने बिंग फुटले सिन्नर : प्रतिनिधी समृद्धी महामार्गावरून वैजापूर येथून मुंबईकडे निघालेल्या एका कारचे…
आता जनावरांची वाहतूक होणार सुरक्षित सिडको विशेष प्रतिनिधी -भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान (DST) आणि…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मोहदरी - चिंचोली परिसरातील वन विभागाच्या डोंगराला अज्ञात कारणास्तव लागलेल्या आगीत…
आपल्या लाडक्या लहान बहिणीच्या लग्नासाठी मेहनत करुन जतन करून ठेवलेली सुमारे पावणे दोन लाख रुपयांची…
नाशिक : प्रतिनिधी आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सामाजिक-भावनिक शिक्षण देण्यासाठी स्लॅम आउट लाउड आणि…
जिल्हा परिषदेच्या आरोग्याधिकार्यांना निवेदन नाशिक : प्रतिनिधी शासनाने ग्रामीण भागात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना बायोमेट्रिक…