format: 0; filter: 2205; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; runfunc: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:0.0000,0.0000; brp_del_sen:0.0000,0.0000; motionR: 0; delta:1; bokeh:1; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 187.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 38;
सिडको : दिलीपराज सोनार
पेशवेकालीन वारसा, शेकडो वर्षांची परंपरा आणि नैसर्गिक रंगांच्या दरवळीत रंगणारा अनोखा उत्सव नाशिकची रंगपंचमी म्हणजे केवळ रंगांची उधळण नाही, तर सामूहिक उत्साहाचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा सोहळा आहे. यंदा हा रंगोत्सव अधिक दिमाखात साजरा होणार असल्याने शहरभर तयारीला वेग आला आहे.
फाल्गुन महिन्याची चाहूल लागताच नाशिकमध्ये वेगळेच चैतन्य संचारते. प्रत्येक गल्लीबोळात रंगोत्सवाच्या चर्चा रंगतात. रहाडींची साफसफाई, नैसर्गिक रंग बनविण्याची लगबग, ढोल-ताशांच्या तालांची तयारी आणि मित्रमंडळांची धावपळ यामुळे वातावरण भारलेले दिसते. दोन वर्षांच्या खंडानंतर आता नाशिककर पुन्हा एकदा पारंपरिक रंगपंचमी मनसोक्त साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
नाशिकची रंगपंचमी म्हटली की, सर्वप्रथम आठवतात त्या पेशवेकालीन रहाडी. साधारण 250 ते 300 वर्षांपूर्वी दगड आणि चुन्यात बांधण्यात आलेल्या या खोल जागा म्हणजे रहाड. पूर्वी येथे तालमीतील पैलवानांचे सामर्थ्यदर्शन होत असे. कुस्तीचे सामने, शक्तिप्रदर्शन आणि उत्साही वातावरण यामुळे या जागांना विशेष महत्त्व होते. कालांतराने या रहाडी रंगोत्सवाचे केंद्र बनल्या आणि रंगपंचमीच्या दिवशी त्या रंगांनी ओसंडून वाहू लागल्या.
इतिहासात पंचवटी परिसरात तब्बल 25 रहाडी अस्तित्वात असल्याच्या नोंदी आढळतात. तांबट गल्ली, तिवंधा चौक, दिल्ली दरवाजा, शनी चौक, दंडे हनुमान चौक, मधली होळी, रविवार कारंजा परिसर आदी भागांत या रहाडींची परंपरा होती. कालौघात अनेक रहाडी नष्ट झाल्या, काही बुजवण्यात आल्या; मात्र आजही काही ठिकाणी ही परंपरा जिवंत आहे आणि त्याच ठिकाणी रंगोत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळतो.
शनी चौकातील रहाड ही परंपरा जपणारी प्रमुख रहाड मानली जाते. रंगपंचमीच्या दिवशी रंगपूजनानंतर प्रथम शनी देव आणि मारुतीवर रंग अर्पण करण्याची प्रथा आजही पाळली जाते. त्यानंतर गुलाबी रंगांची उधळण सुरू होते. या रहाडीत काही तास डुंबल्यानंतरही अंगावरील रंग सहज जात नाही एवढी त्याची घनता असते. स्थानिक मंडळे आणि पारंपरिक घराणी ही परंपरा जतन करत आहेत.
तिवंधा चौकातील सुमारे 12 फूट खोल रहाड पिवळ्या रंगासाठी ओळखली जाते. या रहाडीतील रंग पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार केला जातो. तांबट लेनमधील रहाड सुमारे 15 फूट खोल असून, केशरी किंवा लालसर रंगांनी उजळून निघते. प्रत्येक रहाडीचा आकार, रंग आणि विधी वेगळे असले तरी त्यामागील भावना एकच – सामूहिक आनंद.
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली काजीपुरा परिसरातील रहाड अलीकडे पुन्हा खुली झाली आहे. स्थानिक मंडळांच्या पुढाकाराने या रहाडीचे खोदकाम करण्यात आले असून, यंदा तिथेही रंगोत्सव रंगणार आहे. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली ही रहाड पुन्हा जिवंत झाल्याने परिसरात विशेष उत्साह आहे.
नाशिकच्या रंगपंचमीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, नैसर्गिक रंगांचा वापर. पळस, कासे, पासे अशा विविध झाडांच्या फुलांपासून रंग तयार केले जातात. गरम पाण्यात फुले उकळून तयार केलेले हे रंग पर्यावरणपूरक आणि त्वचेसाठी सुरक्षित असतात. काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने कपडे रंगवण्यासाठी वापरले जाणारे नैसर्गिक रंगही वापरले जातात. रासायनिक रंगांना फाटा देत पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची ही परंपरा नाशिकची वेगळी ओळख निर्माण करते.
रहाडीत धप्पा मारत उडी घेणे, मित्रांसोबत रंगात लोळणे, ढोल-ताशांच्या तालावर नाचत रंगांची उधळण करणे आणि रंगांच्या वर्षावात हरखून जाणे हा अनुभव शब्दात मावणारा नाही. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण या उत्सवात सहभागी होतात. रंगांच्या सरींमध्ये मतभेद, ताणतणाव आणि दैनंदिन धावपळ विसरून सर्वजण एकत्र येतात, हीच या सणाची खरी ताकद आहे. यंदाची रंगपंचमी केवळ सण न राहता परंपरेचा, पर्यावरणपूरक विचारांचा आणि एकोप्याचा उत्सव ठरणार आहे.
Rahadi tradition, an explosion of natural colors
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…