भाजपा कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल आरोटे यांची नियुक्ती

भाजपा कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी राहुल आरोटे यांची नियुक्ती
सिडको विशेष प्रतिनिधी :– नाशिक जिल्ह्यातील युवा, उत्साही आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राहुल आरोटे यांची भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली.

पुण्यातील भाजप कामगार आघाडीच्या मुख्य कार्यालयात कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजय हरगुडे यांच्या हस्ते राहुल आरोटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सत्कार करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

भाजपची कामगार आघाडी ही कामगार, चालक, उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे हितसंबंध जपणारी अग्रगण्य संघटना आहे. औद्योगिक क्षेत्रातील समस्या सोडवणे, समन्वय साधणे आणि कामगारांचा आवाज बुलंद करणे हे या आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. औद्योगिक दृष्टिकोनातून नाशिक हे एक महत्त्वाचे केंद्र असून, कामगार आघाडीच्या माध्यमातून उद्योगांशी निगडित समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे.

राहुल आरोटे यांना या जबाबदारीची नियुक्ती मिळाल्याने नाशिक जिल्ह्यात भाजप कामगार आघाडीला अधिक बळ मिळणार आहे. त्यांची संघटनात्मक कौशल्ये आणि कार्यतत्परता पाहता, ते ही जबाबदारी समर्थपणे सांभाळतील असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

राहुल आरोटे यांच्या नियुक्तीनंतर आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, भाजपा नेते राहुल ढिकले, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, प्रदेश सरचिटणीस रमी राजपूत, नाशिक कामगार आघाडीचे उपाध्यक्ष डॉ. तुषार जगताप, शहराध्यक्ष हेमंत नेहेते आदी अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार आघाडी औद्योगिक कामगारांसाठी प्रभावी भूमिका बजावेल आणि भाजपच्या विचारधारेनुसार कामगार हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा आहे राहुल आरोटे यांनी नियुक्ती स्वीकृत करताना सांगितले की, “कामगार आणि उद्योग क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी तसेच पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. कामगार हक्कांसाठी लढा देणे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रभावी उपक्रम राबवणे हे माझे प्राधान्य असेल.”या निवडीमुळे नाशिक जिल्ह्यात भाजप कामगार आघाडी अधिक प्रभावी आणि संघटित होईल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

 


अंबड सातपुर औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या औद्योगिक कामगारांसाठी प्रभावी भूमिका बजावेल आणि भाजपच्या विचारधारेनुसार कामगार हितासाठी महत्त्वपूर्ण काम करणार आहे “कामगार आणि उद्योग क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी तसेच पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. कामगार हक्कांसाठी लढा देणे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रभावी उपक्रम राबवणे हे माझे प्राधान्य असेल.”
राहुल अरोटे
जिल्हाध्यक्ष
भाजपा कामगार आघाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *