राहुल गांधी म्हणाले, राम राम मंडळी

काजीसांगवी: प्रतिनिधी

भारत न्याय यात्रा आज चांदवड मध्ये दाखल झाली, राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली, सभेत भाषण सुरू करताना राम राम मंडळी असे म्हणत त्यांनी उपस्थित्यांची मने जिंकली, मोदी यांच्यावर टीका करताना त्यांनी मोदी यांची गॅरंटी फक्त अदानी, अंबानी यांच्या सारख्या उद्योगपती ना आहे, सामान्यांना त्यांच्या गॅरंटीचा काहीच उपयोग नाही, शेतमालाला भाव नाही, कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरी आज देशोधडीला लागला आहे, बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे, देशाची घटना बदलण्याचा यांचा डाव आहे, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर टीका केली, यावेळी संजय राऊत,नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राजाराम पांगव्हाणे आदींसह नेते, कार्यकर्ते सहभागी झाले,

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *