नाशिक मनपा आयुक्तपदी राहुल कर्डीले

नाशिक: प्रतिनिधी

महापालिका आयुक्त अशोक करंजकर हे वैधकीय रजेवर गेल्यानंतर

त्यांच्या जागी वर्धा येथील जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची शासनाने  नाशिक मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे आज सकाळीच अशोक करंजकर हे रजेवर गेल्यानंतर त्यांचा पदभार मनीषा खत्री यांच्याकड़े देण्यात आला होता, मात्र सायंकाळी कर्डीले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कर्डिलेंचे शिक्षण सिन्नर तालुक्यात

राहुल कर्डिले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 422 वा क्रमांक मिळवला होता. राहुल कर्डिले यांचे वडील काशीनाथ रायभान कर्डिले हे रयत शिक्षण संस्थेत शिक्षक होते. 1997 मध्ये त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर राहुल कर्डिले यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणगाव (ता. सिन्नर) येथे, तर माध्यमिक शक्षण करंजी (ता. पाथर्डी ) येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण नगरच्या विखे महाविद्यालयात झाले. कर्डिले यांचे वडील रयत शिक्षण संस्थेत शिक्षक होते. त्यांची ठाणगाव ता. सिन्नर येथील भोर विद्यालयात बदली असताना कर्डीले यांचे प्राथमिक शिक्षण ठाणगाव येथे झालेले आहे.
2015 च्या बॅचचे असलेले कर्डीले हे सद्या वर्धा येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून शासनाने गौरव केलेला आहे.

 

 

Bhagwat Udavant

Recent Posts

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन

गोदावरीचे गटारीकरण तात्काळ थांबवा गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचे निवेदन नाशिक : प्रतिनिधी गोदावरीचे…

9 hours ago

‘एसएमबीटी’त घडत आहेत संशोधक

नाशिक : प्रतिनिधी एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, एसएमबीटी डेंटल कॉलेज संगमनेर, एसएमबीटी इन्स्टिट्यूट…

11 hours ago

कुंभमेळा कक्षाची स्थापना, पण कर्मचार्‍यांची वानवा

नाशिक : प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र…

11 hours ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

11 hours ago

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता

कांद्याचे निर्यात शुल्क कमी होऊनही दरात घसरण, शेतकर्‍यांत चिंता सिन्नर : प्रतिनिधी केंद्र शासनाने कांद्यावरील…

11 hours ago

अवघ्या एक रुपयासाठी गमावले प्राण, नेमकी काय घडली घटना?

सिडको : विशेष प्रतिनिधी दहा रुपयाचे सिगारेट 11 रुपयाला का विकतो, याचा जाब विचारल्याने टपरी…

1 day ago