मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुका पोलिसांनी गिगाव फाटा परिसरात छापा टाकून 15 किलो 371 ग्रॅम गांजा जप्त करून एकाला अटक केली आहे. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे तीन लाख 7 हजार 420 रुपये आहे.
नाशिक ग्रामीण व जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होणारी अमली पदार्थांची अवैध तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याच मोहिमेंंतर्गत मालेगाव तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.
तालुक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाट्याजवळ संशयित व्यक्ती गांजाची तस्करी करणार असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून शिरूड (ता. जि. धुळे) येथील शरद हिरालाल शिंदे (वय 45) याला शिताफीने पकडण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्या ताब्यातून 15 किलो 371 ग्रॅम वजनाचा उग्र वासाचा गांजा हस्तगत करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे तीन लाख सात हजार 420 रुपये आहे. या गांजासह तस्करीसाठी वापरलेली मोटारसायकल असा तीन लाख 42 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या आरोपीविरुद्ध मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, तेगबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावंजी, उपनिरीक्षक तुषार भदाणे, तसेच विशेष पथकातील अंमलदार यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…