इंदिरानगरला कत्तलखान्यावर धाड

इंदिरानगर : वार्ताहर
गोवंशाची कत्तल करून मांस वाहनाच्या सहाय्याने इतरत्र घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्यांना इंदिरानगर पोलिसांनी कारवाई करत अटक केली. त्यांच्याकडील पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर गुन्हेशोध पथकाचे अंमलदार सौरभ माळी यांना खबर्‍यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, वडाळागाव, म्हाडा वसाहतीच्या पाठीमागे सादिकनगरनगरकडे जाणार्‍या रोडलगत असलेल्या पत्र्याच्या घरात गोवंशाची कत्तल करून त्याची वाहनांच्या सहाय्याने वाहतूक केली जाणार आहे.
या माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित आरोपी नासिर कय्युम शेख (वय 40, रा. कसईवाडा, वडाळानाका, नाशिक), अब्दुल रहिम कुरेश (37, रा. कसईवाडा, वडाळानाका), सईद मजिद कुरेशी (35, रा. नागसेननगर, वडाळानाका), हसनैन अफरोज कुरेशी (19, रा. कादरी मशिदीजवळ, बागवानपुरा), अफरोज बिस्मिल्ला कुरेशी (51, रा. कादरी मशिदीजवळ, बागवानपुरा), रहीम अब्दुल्ला कुरेशी (58, रा. श्रमिकनगर, गंजमाळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन इनोव्हा कार, सात दुचाकी, दोनशे किलो गोमांस असा एकूण पंधरा लाख 90 हजार रुपयांचा मुद्देेमाल हस्तगत केला.
ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील अंकोलीकर यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हेशोध पथकाचे अधिकारी संतोष फुंदे, पोलीस नाईक परदेशी, पोलीस शिपाई सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभ माळी, जयलाल राठोड, सागर परदेशी, दीपक शिंदे, योगेश जाधव, हवालदार किशोर खरोटे, खान, तळपदे, पोलीस अंमलदार हारपडे यांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष फुदे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार किशोर खरोटे तपास करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *