सुरगाणा । प्रतिनिधी
सुरगाणा तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते,ज्यामुळे उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली होती,मात्र सायंकाळी चारच्या सुमारास गोंदुणे, उंबरठाण, सुरगाणा, वांगण सुळे, बा-हे, मनखेड, आळीवदांड, माणी व बोरगाव घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटात जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाला, तालुक्यातील खिर्डी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने एका घराची पडझड झाली तसेच आळीवंदाड येथील जिल्हा परिषद शाळेचे वादळी वाऱ्याने पत्रे उडवून दिली आहे. मुलांना सुट्ट्या लागल्याने मोठा अनर्थ टळला आहे,या वादळी पावसामुळे काही ठिकाणी आंब्याची झाडे कोसळून पडली, तर विक्रीसाठी तयार झालेला आंबा खाली गळून अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे,
सुरगाणा। तालुक्यातील खिर्डी येथे झालेली घराची पडझड तर दुसऱ्या छायाचित्रात आंबे पिकाचे नुकसान