राज ठाकरे आणि कुटुंबीयांतर्फे काळाराम मंदिरात पूजाअर्चा

राज ठाकरे आणि कुटुंबीयांतर्फे
काळाराम मंदिरात पूजाअर्चा
सामाजिक व राजकीय यशाचे घातले साकडे
नाशिक : वार्ताहर सामाजिक आणि राजकीय जीवनात भरघोस यश प्राप्ती व्हावी असे साकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रभू श्री राम यांना घातले.
मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त नाशकात आले असता राज ठाकरे यांनी शुक्रवारी चिरंजीव अमित ठाकरे आणि स्नुषा मिताली ठाकरे यांच्यासह असंख्य मनसे सैनिकांसह काळाराम मंदिरात दर्शन घेत आरती केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं, उद्धव ठाकरे आणि त्या पाठोपाठ आता राज ठाकरे यांनी नाशिक दौऱ्याच्या वेळी काळारामाची आरती केल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.


शुक्रवारी सकाळी १० वाजता राज ठाकरे त्यांच्या कुटुंबीयांचे काळाराम मंदिर परिसरात आगमन होताच मनसेसैनिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत व ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.पक्षाच्या महिला आघाडीतर्फे पूर्व दरवाजावर सर्वांचे औक्षण करण्यात आले. मंदिर ट्रस्टतर्फे महंत सुधीरदास पुजारी यांनी त्यांचे स्वागत केले. यनिमित्त शंखनाद झाला. महिला भजनी मंडळाने रामधून सादर करीत साथ दिली. यानंतर राज ठाकरे हनुमान आणि प्रभु श्री राम यांच्या चरणी नतमस्तक झाले.नंतर चिरंजीव अमित आणि स्नूषा मिताली यांच्यासह श्रीगणपती पुण्याहवाचन व श्री प्रभुरामचंद्राची षोडशोपचार पूजा, अभिषेक व महाआरती केली. मंगेश पुजारी,नरेश पुजारी, श्रीकांत पुजारी,मुकुंद पुजारी व नरेंद्र पुजारी यांनी पौरोहित्य केले. धनंजय पुजारी,अ‍ॅड.अजय निकम, शुभम मंत्री, मंदार जानोरकर,दिलीप कैचे,मिलींद तारे,डॉ. एकनाथ कुलकर्णी यांनी शाल व प्रतिमा देवून ठाकरे कुटुंबीयांचा यथोचित सत्कार केला. राज ठाकरे यांनी नंतर प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या दीदींशी भेट घेतली.के.के.वाघ कॉलेज ऑफ फाईन आर्टचे प्राध्यापक ऋषिकेश भंडारे यांनी काढलेल्या स्केच पेंटींगचेही नंतर त्यांनी निरीक्षण केले. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, सचिन मोरे ,लोकसभा संघटक अॅड. किशोर शिदे ,गणेश सातपुते, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, डाॅ.प्रदीप पवार, अॅड. रतनकुमार इचम, माजी नगरसेवक सलीम शेख ,पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, दिलीप दातीर , योगेश शेवरे ,सुजाता डेरे , विभागीय अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, शाम गोहाड, बंटी लभडे, धीरज भोसले, साहेबराब खर्जूल, प्रसाद सानप आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *