धनंजय बेळे यांच्याकडून निमाची कार्यकारिणी जाहीर
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅनुफॅक्टरर्स असोसिएशनची कार्यकारिणी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी जाहीर केली. काल रविवार (दि.15) रोजी पहिली कार्यकारिणी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अध्यक्षमार्फत घटनेनुसार नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
घटनेनुसार मानद सरचिटणीससाठी राजेंद्र आहिरे, उपाध्यक्ष मोठे उद्योग गट -किशोर राठी, उपाध्यक्ष लहान उद्योग गट -आशिष नहार, खजिनदार विरल ठक्कर, सह सचिव हर्षद ब्राह्मणकर, निमा हाऊस उपसमितिच्या अध्यक्ष पदी राजेंद्र वडनेरे, सिन्नर उपसमितीच्या चेअरमन संदीप भदाणे व को चेअरमन सुरेंद्र मिश्रा,
दिंडोरी उपसमिती चेअरमन पदी नितीन वागस्कर, यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
हेही वाचा :निमाच्या विश्वस्तांची निवड
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा धनंजय बेळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
घटनेनुसार निवडलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन निमाच्या सभासदांकडून करण्यात येत असून. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने तसेच उद्योजकांचे मागील २ वर्षणापासून असलेल्या प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन नवीन पदाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी सर्व नवीन नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :निमाच्या अध्यक्षपदी धनंजय बेळे यांची निवड