राजेंद्र सूर्यवंशी : दोन हजार गुंतवणुकदारांचे व्यवस्थापन सांभाळणारा मराठी माणूस

राजेंद्र सूर्यवंशी : दोन हजार गुंतवणुकदारांचे व्यवस्थापन सांभाळणारा मराठी माणूस

शेअर बाजार आणि मराठी माणूस यांचे नाते तसे फार दूरचे. शेअर मार्केटचे केंद्र महाराष्ट्राच्या राजधानीत असले, तरी शेअर मार्केटमध्ये मराठी माणूस नसल्याचे अनेकदा आपण ऐकत असतो. शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार आहे, अशा मानसिकतेमुळेही असेल कदाचित, पण मराठी माणूस त्यापासून दूरच राहतो, हे वास्तव आहे. आपल्या आजुबाजूलाही शेअर मार्केटमध्ये यशस्वी झाल्याची उदाहरणे दिसत नाहीत. यामुळे मराठी माणूस आणखीनच यापासून दूर राहतो. अशा वातावरणामध्ये शेतकऱ्याच्या घरात जन्मलेल्या व व्यवसायाने बांधकाम ठेकेदार असलेले राजेंद्र सूर्यवंशी यांनी शेअर मार्केटचा सखोल अभ्यास केला. एवढेच नाही, तर या अभ्यासाच्या आधाराने प्रत्यक्ष ट्रेडिंगमध्येही यशस्वी ट्रेड करण्याचे आणि शेअर मार्केटचे पेडिक्शन करण्याचे कौशल्य प्राप्त केले. त्यांनी प्रत्येक आठवड्याला जाहीर केलेल्या अंदाजांचे प्रमाण जवळपास ९९ टक्के आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर विश्‍वास वाढत गेला आणि आज ते दोन हजार गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करीत असून ते सेबीचे मान्यताप्राप्त सल्लागार आहेत.
राजेंद्र विठ्ठल सूर्यवंशी हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज तालुक्यात शेतकऱ्याच्या घरात जन्माला आले. मोठा भाऊ नाशिकला नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाल्याने ते शिक्षणासाठी नाशिकला आले. मखमलाबादच्या शाळेतच शिकून ते पुढे बीई सिव्हिल झाले. त्या आधाराने त्यांनी बांधकाम ठेकेदारी म्हणून व्यवसाय सुरू केला. बांधकाम ठेकेदारीचा व्यवसाय चांगला चालला असतानाच त्यांना शेअरबाजाराविषयी माहिती मिळाल्याने सुरवातीला कुतुहल व चांगल्या परताव्याच्या अपेक्षेने त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक व ट्रेडिंग सुरू केली. तेजीच्या काळात कमाई व मंदिच्या काळात सर्व नफा व भांडवल गमावण्याचा सर्वसामान्यांसाठी असलेला अनुभव त्यांच्याही वाट्याला आला. सर्वसाधारणपणे एकदा पोळले की, लोक शेअरमार्केटपासून दूर पळतात व पुन्हा शेअरबाजाराचे नावही घेत नाहीत. मात्र, राजेंद्र सूर्यवंशी यांनी शेअरमार्केटमध्ये हरवलेला नफा व भांडवलाचा शोध त्यांनी तेथेच शोधण्याचा निर्धार केला. त्यासाठी शेअर मार्केटचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एकीकडे ट्रेडिंग करणे व दुसरीकडे शेअर मार्केटचा अभ्यास करणे असे सुरू ठेवले. यासाठी त्यांनी चांगला जम बसलेला ठेकेदारी व्यवसाय सोडून देऊन केवळ शेअर बाजाराचाच ध्यास घेतला. यात त्यांनी जवळपास १२ वर्षे शेअर मार्केटचा सखोल अभ्यास केला. सर्वसाधारणपणे शेअरमार्केटमध्ये कोणतेही सल्लागार हे साधारणपणे फंडामेंटल व तांत्रिक विश्‍लेषण यापैकी एकाची निवड करून त्याप्रमाणे आपली व्यूहनिती ठरवत असतात. मात्र, सूर्यवंशी यांनी तांत्रिक विश्‍लेषण करताना त्याला फंडामेंटल विश्‍लेषणाची जोड दिली. यामुळे शेअरमार्केटबाबत त्यांनी व्यक्त केलेले भाकित खरे ठरू लागले. या बारा वर्षामध्ये त्यांना शेअर मार्केटची दिशा समजण्याइतपत सिदधी प्राप्त झाली. मात्र, प्रत्यक्ष ट्रेडिंग करताना या दिशा समजण्याचा फायदा उठवता येत नव्हता. यामुळे दुसऱ्या टप्प्यात त्यांनी यशस्वी ट्रेडिंग कसे करावे, यावर लक्ष केंद्रित केले. यासाठी त्यांनी फंडामेंटल व टेक्निकल माहित असल्यानंतर प्रत्यक्ष शेअरच्या किंमती वरखाली जाणे व त्याचा किंमतीमधील चढउताराचा ट्रेडिंगसाठी फायदा कसा घ्यायचा यासाठी स्वताच्या ट्रेडिंग पद्धती शोधण्यावर लक्ष केंद्रित केले. यासाठी त्यांनी अभ्यासासाठी अनेक शेअर्सची निवड करून त्यांच्या किंमतीतील चढउतारांवर महिनोंमहिने लक्ष ठेवले व त्यातून स्वताचे ट्रेडिंग पॅटर्न शोधून काढले. या सगळ्यांसाठी त्यांना पाच वर्षे व्यतित करावी लागली. शेअर मार्केटचे अंतरंग समजून घेण्यासाठी आयुष्यातील १७ वर्षे दिल्यानंतर त्यांनी गुंतवणूकदारांना सल्ला देण्यास सुरवात केली. सूर्यवंशी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपला फायदा होत असल्याचे बघून गुंतवणूकदार त्यांच्यावर विश्‍वास ठेवू लागले. सुरवातीला वर्तमानपत्रातून शेअर मार्केटचे विश्‍लेषण करणाऱ्या सूर्यवंशी यांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही आपले अंदाज व्यक्त करण्यास सुरवात केली. यामुळे त्यांचा प्रेक्षकवर्ग मोठ्याप्रमाणावर वाढली व अगदी देशभरातून गुंतवणूकदार त्यांच्या संपर्कात आले. त्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसारच पुढील आठवड्यात मार्केट जात असल्याचे बघून त्यांच्याकडील गुंतवणूकदारांचा ओघ वाढत गेला. सूर्यवंशी सध्या दोन हजार गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ सांभाळत असून त्यांन या अनिश्‍चिततेच्या बाजारात निश्‍चित उत्पन्न मिळवून देण्याचा विश्‍वास देत आहेत.

 

शेअर बाजार सर्वेात्तम व्यवसाय
शेअरमार्केटबाबत ते सांगतात की, इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शेअरमार्केट हा अत्यंत चांगला व्यवसाय आहे. या व्यवसायात सर्वाधिक तरलता आहे. खरेदी व विक्रीमध्ये पारदर्शकता आहे. विक्रीनंतर आपली रक्कम बुडण्याचा धोका नाही. तसेच नैसर्गिक आपत्ती सारख्या घटनाचा फटका बसत नाही. आणखी महत्वाचे म्हणजे हा व्यवसाय बदलण्यासही अत्यंत सहज व सोपा आहे. यामुळे मराठी तरुणांसाठी हा सर्वात चांगला व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी बुद्धीमत्ता आणि मेहनत करण्याची तयारी दोन बाबींची गरज आहे. त्या असतील, तर कोणीही या व्यवसायात सहज यशस्वी होऊ शकतो, असा विश्‍वास ते देतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे व ट्रेडिंग करणे या दोन भिन्न बाबी असून आपला इतर व्यवसाय सांभाळणाऱ्या व्यक्तिंनी गुंतवणुकीवर भर दिल्यास त्यांना निश्‍चितपणे चांगला परताना मिळू शकतो. एशियन पेंटस्, पीडीलाईट, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा आदी शेकडो कंपन्यांनी गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये अनेक पट परताना मिळून दिला आहे. यामुळे शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक किमान पाच वर्षांची असली पाहिजे, असेही ते आवर्जुन सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *