रामकथा ही प्रभूची वाड्मयीन पूजा

रमेश भाई ओझा: रामकथा ज्ञानयज्ञाला प्रारंभ
नाशिक : प्रतिनिधी
रामकथा ही प्रभूची वाड्मयीन पूजा आहे. पुराण हे संवादाच्या रुपाने प्रकट होतात. मन, विचार, वाणी, व्यवहार, कर्म हे एक असते.  भगवत्गीता ,रामायण , भागवत कथा हे संवाद आहेत. कथन हे श्रद्धेतूनच व्हायला हवे. कारण प्रत्येक शब्दातून देव आपल्याशी बोलत असतो.
रामकथेत मुनि भारद्वाज आणि आख्यवत, शंकर  आणि पार्वतीचा, अग्य खंडी आणि गरुडाचा  संवाद आहे, असे विचार भाईश्री रमेश भाई ओझा यांनी व्यक्त केले.
वै. तुकारामबाबा खेडलेकर यांच्या सुवर्णमहोत्सवी पुण्यतिथीनिमित्त नऊ दिवशीय दिव्य श्रीरामकथा ज्ञानयज्ञाला कालपासून तपोवनातील मोदी मैदान येथे प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी रामानुजाचार्य विद्याभास्कर महाराज यांनी रामकथेचा सार सांगितला. मोहनाबाई राठी, पुष्पा नावंदर, प्रमिला राठी, विमला बालदायीवा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रमेशभाई ओझा यांना कमलपुष्परुपी आसनात बसवून ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला.
देव हा अखंड स्वरूपात आहे तो एकरूप आहे. आपण प्रत्येक जण विभागलो आहोत…म्हणून आपण देवाची श्रद्धा करण्याची आवश्यकता आहे. आपण विभागलो आहोत म्हणजेच ..आपले विचार वेगळे आहेत..बोलणे वेगळ आहे. वागणे वेगळ आहे ..त्यासाठी  समर्पण भावनेने देवाची श्रद्धा  करायला हवी. ज्यांच  मन ,विचार ,बोलण आणि  कर्म एक असेल ते महात्मा असतात.   प्रभु रामचंद्र हे  जे विचार करतात  तेच बोलतात आणि जे बोलतात  तेच करतात.. आपण म्हणूनच रामकथेच कथन करत आहोत. प्रभू रामचंद्र हे एकवचनी आहेत.   आपण मात्र मुखवटे वापरत जगत असतो.  कथा प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला जीवनाचा संदेश मिळतो. रामचरित्र मानस कथन पंचवटीच्या भूमितच लक्ष्मणाने प्रभु श्रीरामाला प्रश्न विचारला आहे. भक्ती प्राप्त कशी करायची ? त्यावर रामाने उत्तर दिले, भक्ती मिळवण्यासाठी साधना करावी लागते. प्रत्येकाच्या साधनेतून कळत तो सच्चा भक्त कोण आहे. साधनेच्या वाटचालीवर भक्ती  प्राप्त होते.  भक्तीच नाटक करणार्‍याला भक्त मानता येणार नाही. जीवनात आवश्यकता नसेल तर जास्त बोलण्याची आवश्यकता नसते. मौनातून ही अर्थ समजतो.
अध्यात्मिक क्षेत्रात राहणारे लोक पारिभाषिक आत्मसात करतात. आणि भाषेचा विवेक पूर्ण  वापर करतात. आणि पारिभाषिक शब्द आत्मसात करतात.बालकाच्या जन्मानंतर उत्सव बनवला जातो.  संत परंपरेत  देव आणि माणूस यांच्यातील फरक. जन्मादी संसारात लोक उत्सव साजरे करतात..देवाचे प्रकट होण हे दृष्टाच्या संपवण्यासाठी संहार करण्यासाठी असत.माणूस हा संसारात अडकून पडतो..पण संत जीवन सोडताना भक्तीत समर्पित होत सोडतात.ज्यांनी आपल जीवन साधनेत घालवले त्यांच आयुष्य सफल झाले. खेडलेकर महाराजांनी साधनेने आपल जीवन सार्थकी लावले व त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांचे जीवन सार्थकी लावले. अध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी आपण सफल व्हावे यासाठी अशा सत्संगाची  गरज असते, असे भाईश्री म्हणाले.
यांनी केली आरती
पहिल्या दिवशीची कथा समाप्तीनंतर  ब्रिजलाल धुत, हरिकिसन नावंदर, प्रभुणे महाराज, विश्‍वनाथ नावंदर, घनश्याम नावंदर, राधिका नावंदर, साक्षी नावंदर, संदीप सोमाणी, , अमरिशभाई शाह यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तर न्या. डी.सी अकाली, सुहास सराफ, जळगावचे सुशिल नवाल, सविता नवाल, वैद्य विक्रांत जाधव यांचा यावेळी भाईश्रींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *