नाशिक

त्र्यंबकनगरीच्या प्रवेशद्वारी खडड्यांची रांगोळी

भाविकांना त्रास; पितृपक्षात येणार हजारो वाहने

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शहरात प्रवेश करण्यासाठी खड्डयांची शर्यत पार करावी लागण्याची वेळ भाविक व स्थानिकांच्या वाहनांवर आली आहे. शहराच्या प्रवेशद्वारी संत गजानन महाराज संस्थानसमोर असलेल्या त्रिफुली रस्त्यावर झालेल्या खड्डयांनी भाविकांचे स्वागत होत आहे.
श्रावण महिना पर्वकाल साधण्यासाठी लक्षावधी भाविक या खड्ड्यांमधूनच आले आणि माघारी गेले. गणपती बाप्पाचे आगमनदेखील याच खड्डेमय रस्त्याने झाले आणि आता गणपती बाप्पांचे विसर्जन होईल व पितृपक्षाला प्रारंभ होत आहे.
त्र्यंबकेश्वर येथे पितृपक्षात दररोज हजारो भाविक श्राद्धविधी करण्यासाठी येत असतात. कोट्यवधींची उलाढाल या पंधरा दिवसांत होत असते. मात्र, त्यासाठी येणार्‍या भाविकांचे स्वागत खडडयांनी होईल असे दिसते. हजारो वाहने या रस्त्याने येतात. याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे.
गोदावरी नदी पुलापासून ते संत गजानन महाराज प्रवेश कमान व त्यापुढे रस्त्याची चाळण झाली आहे. येथे असलेल्या त्रिफुलीवर वाहने चालवताना वाहनचालकांची होणारी कसरत पाहता केव्हाही अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्र्यंबक नगरपरिषद येथे टोलनाका लावून वाहन प्रवेश फी आकारणी करत असते.
या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाला वर्षाकाठी सव्वाकोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, खराब झालेला रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असल्याचे सांगण्यात येते. साहजिकच सार्वजनिक बांधकाम विभाग, त्र्यंबक नगरपरिषद यांपैकी कोणीही या रस्त्याच्या देखभालीचे उत्तरदायित्व घेत नसल्याने नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? असा सवाल उपस्थित झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी येत असतात. प्रशासकीय कामकाजासाठी अधिकारी नियमित येथे येतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेवर कोणीही चकार शब्द बोलत कसे नाही, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

प्रशासकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

मागच्या काही दिवसांपूर्वी साधू, महंतांच्या भेटीस आलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांना येथील साधू, महंतांनी तुम्ही या रस्त्याने आला तेव्हा खड्ड्यांचा त्रास जाणवला नाही का? असा खोचक प्रश्न विचारला होता. त्यानंतर या रस्त्याची दुर्दशा संपली अशी आशा नागरिकांना होती. मात्र, आजही रस्त्याची परिस्थिती जैसे थे राहिल्याने अधिकार्‍यांनी साधूंची मागणी मनावर घेतली नसून, त्यांनी केवळ भेटीची औपचारिकता पूर्ण केली असावी, अशी चर्चा येथे होत आहे.

 

Editorial Team

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

9 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

10 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

10 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

10 hours ago