महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची
धमकी देत वेळोवेळी लैंगिक अत्याचार
नाशिक : प्रतिनिधी
ब्युटी पार्लर मध्ये छुपे कॅमेरे बसून नग्न अवस्थेत फोटो काढून ते मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी देत २०२२ पासून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली, याप्रकरणीकोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील अर्जुन देवकर (रा.टाकळी, कोपरगांव) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट २२/२०२२ रोजी फिर्यादी हिच्या पार्लर व्यवसयासाठी आरोपी याने रुपये ५ लाख रुपये उसनवारी दिले. असता आरोपी याने पार्लरमध्ये छुपे कॅमेरे बसून फिर्यादीचे नग्न अवस्थेत फोटो काढून सदर फोटो हे व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादी सोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी हिच्या २०२२ रोजी पार्लर मध्ये त्याच बरोबरी धारणगाव रोड येथील ऑफिसवर आणि नाशिक येथील एका लॉजवर बळजबरीने शारीरिक संबंध ठेऊन धमकावले असता फिर्यादी हिने आरोपी याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्या प्रमाणे आरोपी याच्या विरुद्ध भा.द.वी कलम ३७६ (२) (N),५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक करून .विशेष तथा अति. जिल्हा व सत्र न्यायालय कोपरगाव यांचे समक्ष रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी हजर केले असता .न्यायालयाने आरोपी यास ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा हे करत आहे.
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…