मालेगावचे माजी आमदार शेख रशीद यांचे निधन
मालेगाव: प्रतिनिधी
मालेगाव चे माजी आमदार तथा महापौर रशीद शेख यांचे निधन झाले आहे, अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.ते ६५ वर्षाचे होते.अलीकडेच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी ते मालेगावच्या रुग्णालयात दाखल होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतू त्यांना त्रास वाढल्यानंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हसतमुख, अभ्यासू व सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जायचे, ते मालेगाव मतदार संघाचे दोन वेळा आमदार होते. त्यांनी राज्याचे हेविगेट नेते निहाल अहमद यांचा पराभव केला होता.
१९९९ मध्ये रशीद यांनी मालेगावमधून 25 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या अहमद यांचा पराभव करून राजकीय विश्लेषकांना धक्का दिला होता. १९९९ मध्ये आमदार म्हणून ते सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा भाग होते. २००४ मध्ये ते पुन्हा त्याच सत्ताधारी आघाडीचा भाग होते. २००९ मध्ये,विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २००९ मध्ये ते जिंकले असते तर त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले असते, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. पण ते त्याच्या नशिबात नव्हते.
२००१ च्या भीषण जातीय दंगलीनंतर स्थापन करण्यात आलेला आयोग. २००६ च्या मुशाव्रत चौक बॉम्बस्फोटानंतर स्थापन करण्यात आलेल्या मालेगाव सामान्य रुग्णालयाच्या स्थापनेसाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. .
मालेगावमधील राजकारण एका वेगळ्या लोकसंख्येच्या विभाजनाच्या प्रिझममधून पाहिले जाते हे कटू सत्य आहे. मोसम नदीच्या दोन्ही बाजूचे मतदार आपापल्या नेत्यांना मत देतात. तथापि, असे म्हटले जाते की रशीद हा पहिला नेता होता ज्याने हा नियम काही प्रमाणात मोडला.मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा त्यांनी सांभाळली, अलीकडेच राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला होता. ते आधी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते.
माजी आमदार रशीद शेख यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर १९९९ व २००९ असे दोन वेळा आमदारकी भुषविली. २०१७ मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. तत्पुर्वी १९९४ मध्ये नगराध्यक्ष होते. यापुर्वी तीन वेळा नगरसेवक म्हणून विजयी झालेले होते. कॉंग्रेस शासन कार्यकाळात त्यांना राज्यमंत्री पद दर्जाचे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. आमदार शेख घराणे कॉंग्रेसशी एकनिष्ठ व पक्षाची जिल्ह्यातील मोठी ताकद होती. सुमारे चाळीस वर्षांपासून राजकारण, समाजकारणात ते सक्रिय होते.
आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, रस्ते, गटार, पाणी या कामांना प्राधान्य देत शहरासाठी अनेक विकासकामे त्यांनी मार्गी लावली.शेख यांनी विकासाचा, सामाजिक शांतता व राष्ट्रीय एकात्मतेचा पाया रचला. त्यांच्या नेतृत्वानंतरच शहराने विकासाची कास धरली. त्यांच्या कामाची कार्यपद्धती व दातृत्वाचा गुण घेण्यासारखा आहे. अशा शब्दात त्यांचे कौतुक सर्वपक्षीय नेत्यांनी मालेगावात केले होते.त्यांनी यापूर्वी नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, महापौर अशी सर्व पदे भूषविली.
शेख यांनी आता आगामी खासदारकीची निवडणूक लढवावी असाही सुर उमटला होता.त्यांची कै.खलील दादा यांचे घर ,गल्ली नं.१ हजार खोली येथून अंत्ययात्रा निघणार असून आयेशा नगर कब्रस्तान येथे स.११ वा.दफन विधी होणार आहे.