आंदोलन शांततेत : वाहतूक खोळंबली
सग्यासोयऱ्यांचा कायदा लागू करावा यासाठी मखमलाबादला रास्तारोको
पंचवटी : वार्ताहर
राज्य सरकारने देऊ केलेले दहा टक्के मान्य नाही , सगेसोयरे यांच्याबद्दल निर्णय व्हावा , राज्य सरकारने देऊ केलेल्या आरक्षणामुळे मराठा समाजाचे समाधान झालेले नाही. त्यामुळे जोपर्यंत सग्यासोयऱ्यांच्या बाबतीत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे शनिवार (दि.२४ ) राज्यभर रास्ता रोको करण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील केले होते . त्यास सर्वत्र प्रतिसाद मिळत असून मखमलाबाद गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मखमलाबाद बस स्थानकावर रास्ता रोको करण्यात आला . यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक खोळंबली होती . तर म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांना निवेदन देण्यात येऊन सरकार पर्यंत मराठा समाजाच्या भावना पोहचवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षकांना करण्यात आले.
मराठा आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एक मताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात १० टक्के लागू झाल्याची घोषणा केली असली तरी मराठा समाजाचे त्यामुळे समाधान झालेले नाही . त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार ओबीस मधून आरक्षण देत नाही व सग्यासोयऱ्यांचा कायदा लागू होत नाही , तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे . तर मागण्या मंजूर होत नाही त्यासाठी (दि.२४ )फेब्रुवारी रोजी राज्यभर रास्ता रोको करण्याचे आवाहन जरांगे यांनी केल्याने त्यास प्रतिसाद देत मखमलाबाद गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने मखमलाबाद गावातील बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने “जय जिजाऊ जय शिवराय” होश मे आओ होश मे आओ राज्य सरकार होश मे आओ “”मनोज जरांगे आगे बढो हम तुम्हारे साथ है ” “सगे सोयरे कायदा लागू झालाच पाहिजे” ” आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच ” “कोण म्हणतो देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही ” अशा प्रकारच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता .
यावेळी सचिन पिंगळे, संजय फडोळ, शंकरराव पिंगळे, मदनशेठ पिंगळे, तानाजी पिंगळे ,आबासाहेब बर्डे ,निवृत्ती महाले , नितीन पिंगळे, प्रभाकर पिंगळे , वसंत महाले , दिलीपराव पिंगळे, गणेश पिंगळे , योगेश पिंगळे , शिवाजी पिंगळे , प्रतिक पिंगळे , संदीप निकम , मयूर पिंगळे, विजय ( भाउ ) पिंगळे , रामदास पिंगळे , कैलास कहांडळ , अशोक हेंगडे , तुषार पिंगळे, सुरेश पिंगळे, प्रवीण पिंगळे , सागर पिंगळे , संजय पिंगळे , मोहन गवारे , बारकु मेहंदळे , शंकर पिंगळे ( सर) , किरण कहांडळ , साहेबराव पिंगळे, ज्ञानेश्वर पिंगळे, प्रभाकर फडोळ आदींसह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल माळी, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुभाष पवार वाहतूक शाखेचे हवालदार मुकेश इंगवले , शिवराज गायकवाड , सुशील पाटील , आण्णासाहेब गुंजाळ , म्हसरूळ पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे दीपक आरगडे तसेच हवालदार वाल्मीक खैरनार आदींसह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
वाहतूक खोळंबली
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मखमलाबाद बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी मखमलाबाद – म्हसरूळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली होती. तर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रास्ता रोको दरम्यान विद्यार्थांच्या वाहनांना सोडले जात होते . तर जे पालक विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होते त्यांना सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जागा मोकळी करून वाट करून देत होते. रास्ता रोको आटोपताच वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली .
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…