रथ मिरवणुकीमुळे या मार्गांवर वाहतुकीस बंदी

नाशिक : प्रतिनिधी
एकादशीला निघणार्‍या रामरथ आणि गरुड रथ मिरवणुकीमुळे नागरिकांची आणि वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी याबाबत काल अधिसूचना काढली. रथ मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. मिरवणूक मार्गावरील वाहतूक मार्गातील बदल सुचवले आहेत. रथाच्या मिरवणुकीच्या मार्गावर पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दल व अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहनांना सर्व निर्बंध लागू करण्यात आले आहे.उद्या दुपारी तीन वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत रथाच्या मार्गात सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत. सर्व वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग

1 काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडी मार्ग मेनरोड कडे जाणार्‍या वाहनांनी पंचवटी कारंजा मार्गे इतरत्र जावे.
2 काट्या मारुती संतोष टी पोइंत द्वारका सर्कल सारडा सर्कल मार्गे इतरत्र जावे.
3 बादशाही कॉर्नरकडील वाहने शालीमार, गंजमाळ,सीबीएस मार्गे ये- जा करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *