प्रभाग 9 मध्ये उद्यापासून रेशनकार्ड शिबिर
नाशिक: प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी तर्फे दि.10 व 11 रोजी श्रमीकनगर येथील महादेव मंदिर येथे रेशनकार्ड व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक 9 मधील सामाजिक कार्यकर्त्या सविता करण गायकर, प्रेम दशरथ पाटील, अर्चना तूपलोंढे आणि हेमलता कांडेकर यांनी प्रभागातील नागरिकांच्या सोयीसाठी आयोजित केलेल्या या शिबिरात नवीन शिधा पत्रिका, रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे, नावे वाढवणे,दुय्यम शिधापत्रिका बनवणे,तसेच आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करून उपचारा बाबत मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 9 वाजेपासून या शिबिराला सुरुवात होणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सविता करण गायकर यांनी केले आहे.