परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे आश्वासन
मुंबई :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. विधान परिषदेत बुधवारी आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी उचलल्या जाणार्या पावलांची सविस्तर माहिती दिली.
महामंडळात लवकरच 17,742 चालक आणि वाहकांची मेगाभरती केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. आमदार श्रीकांत भारतीय यांनी कंत्राटी भरती आणि कर्मचार्यांच्या वेतनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सरनाईक म्हणाले की, 2022 मधील एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत, म्हणून तातडीचा उपाय म्हणून कंत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती. ही एक अपरिहार्य आणि तात्पुरती व्यवस्था होती. सध्या एसटीच्या ताफ्यात 14,000 बसेस असून, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, कर्मचार्यांची ही कमतरता भरून काढण्यासाठी कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
या भरतीमुळे महामंडळाची स्वतःची हक्काची यंत्रणा अधिक मजबूत होईल आणि कंत्राटी पद्धतीवरील अवलंबित्व कमी होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. महायुती सरकारने एसटीसाठी दरवर्षी 5,000 नवीन बसेस घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापैकी 8,000 बसेसची निविदा महिलांसाठी 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास यांसारख्या लोककल्याणकारी योजनांमुळे जरी महामंडळावर आर्थिक भार येत असला, तरी ’प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून सरकार सर्वसामान्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार श्रीकांत भारतीय यांनी कर्मचार्यांची सुरक्षितता आणि कामाच्या दर्जाबाबत व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत, मंत्र्यांनी सांगितले की, या मेगाभरतीमुळे एसटीचा दर्जा अधिक सुधारेल. तसेच या विषयावर अधिक सखोल चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
भरतीचा असा आहे आराखडा
महामंडळाने राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे भरतीचा सविस्तर प्रस्ताव पाठवला आहे. यात 12,381 पदे ही नवीन चालक आणि वाहकांसाठी, तर 5,361 पदे ही पुढील चार वर्षांत निवृत्त होणार्या कर्मचार्यांच्या जागा भरण्यासाठी, अशी एकूण 17,742 कर्मचार्यांची मेगाभरती करण्यात येणार आहे.
Recruitment for 17,742 posts will be held in ST Corporation
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…