पालिकेत लवकरच सातशे पदांसाठी भरती

नाशिक :  प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य शासनाने नोकर भरतीवरील निर्बंध हटवल्याने नाशिक महापालिकेने आरोग्यसह वैद्यकीय विभागातील अठ्ठावीस संवर्गातील ३५८ व अग्निशमनच्या आठ संवर्गातील ३४८ असे एकूण ७०६ पद भरण्याची तयारी केली आहे. याबाबतीत शासनाकडून मार्गदर्शक तत्व जारी करण्यात आले आहे.फेब्रुवारी पर्यत हीं भरती होण्याची शक्यता आहे

महापालिकेच्या उत्पन्नाचा विचार केला तर चालू आर्थिक वर्षात आस्थापना खर्च 34.06 आहे, तर 35 टक्के पेक्षा जास्त खर्च राहिल्यावर भरती प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून मार्च एंड पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य शासनाने नोकर भरतीवरील निर्बंध हटवल्याने नाशिक महापालिकेत रिक्त पदे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सी मार्फत मार्च 2023 पूर्वी नाशिक महापालिकेत महत्त्वाचे पदे भरले जाणार आहे.

नाशिक महापालिकेत मागील 24 वर्षांपासून नोकर भरतीची झालेली नाही तर दुसरीकडे दर महिन्याला सतत महापालिकेचे अधिकारी सेवक सेवानिवृत्त होत आहे. एकीकडे नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत आहे तर दुसरीकडे महापालिकेत मनुष्यबळाची कमी असल्यामुळे आहे त्या अधिकारी व सेवकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. पालिकेत भरती झाल्यास याचा दैनंदिन कामास मदतच होणार आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *