अवकाळीने दिलासा; टँकरफेर्‍यांत 34 ने घट

तीन लाख लोकसंख्येसाठी 356 टँकरफेर्‍या

नाशिक : प्रतिनिधी
उन्हाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील ओढे, तलाव, विहिरी यांच्या पातळीत वाढ झाल्याने 390 वर गेलेली टँकर फेर्‍यांची संख्या आता 356 वर आली आहे. आठवडाभरात टँकरफेर्‍यांत 34 ने घट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी 399 वर टँकर फेर्‍यांची संख्या गेली होती. 77 विहिरींचे अधिगृहण करण्यात आले. त्यात 60 टँकरसाठी, तर 17 विहिरींचे गावांसाठी अधिगृहण केल आहे. सध्या जिल्ह्यातील 627 गावांतील दोन लाख 93 हजार 454 लोकसंख्येला 159 टँकरच्या माध्यमातून 356 टँकरफेर्‍यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

नांदगाव तालुक्यात सर्वाधिक टंचाई

नांदगाव तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई असून,

तालुक्यातील 153 गावांना 52 टँकरफेर्‍यांद्वारे

पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

 

तीन तालुक्यांत टँकरफेर्‍यांत घट

चांदवड, सिन्नर व येवला तालुक्यात टँकरफेर्‍यांत घट झाली आहे.

चांदवड तालुक्यात मागील सोमवारी 41 टँकर सुरू होते.

आता त्यात सहाने घट होऊन टँकरफेर्‍या 34 वर आल्या आहेत.

सिन्नर तालुक्यात गेल्या सोमवारी 58 टँकर सुरू होते.

त्यात घट सहाने घट होऊन टँकर फेर्‍यांची संख्या 56 वर आली आहे

. येवला तालुक्यात मागील सोमवारी 73 टँकरफेर्‍या सुरू होत्या.

त्यात घट होऊन आता 52 टँकरफेर्‍या सुरू आहेत.

 

तालुका गाव टँकरफेर्‍या

 बागलाण    –  06      –      06
चांदवड      –    35     –     34
देवळा        –     12     –      10
इगतपुरी     –     75    –      47
कळवण      –    08    –      00
मालेगाव     –      54   –      25
नांदगाव      –     153  –       62
 पेठ              –        30 –       25
  सुरगाणा      –      23    –       31
   सिन्नर       –       96    –      52
   त्र्यंबकेश्वर   –          25  –      08
   येवला          –      110    –       52
  एकूण          –  627     –      356

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *